शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

कोरोनानंतर 'या' व्हायरसने वाढवलं WHO चं टेन्शन; 'ही' आहेत लक्षणं, अशी घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 17:48 IST

कोरोनासोबतच आता आणखी एका व्हायरसचा कहर पाहायला मिळत आहे, ज्यामुळे WHO ची चिंता वाढली आहे.

कोरोनासोबतच आता आणखी एका व्हायरसचा कहर पाहायला मिळत आहे, ज्यामुळे WHO ची चिंता वाढली आहे. हा एक दुर्मिळ व्हायरस आहे, जो अत्यंत धोकादायक असल्याचं म्हटलं जातं. अर्जेंटिनाच्या इंटरनॅशनल हेल्थ रेग्युलेशन नॅशनल फोकल पॉइंट (IHR NFP) ने WHO ला वेस्टर्न इक्विन एन्सेफलायटीस (WEE) इंफेक्शनच्या एका केसबद्दल माहिती दिली आहे. दोन दशकांनंतर नोंदवलेले हे पहिले मानवी प्रकरण आहे. अर्जेंटिनामध्ये 1982, 1983 आणि 1996 मध्ये WEE ची मानवी प्रकरणे शेवटची नोंदवली गेली. हा व्हायरस नेमका काय आहे आणि तो किती धोकादायक आहे हे जाणून घेऊया... WEE व्हायरस काय आहे?

WEE हा दुर्मिळ डासांमुळे पसरणारा व्हायरस आहे. ज्याचा परिणाम घोडा आणि मानवांवर जास्त होतो. हा व्हायरस संक्रमित पक्ष्यांकडून मानवापर्यंत पोहोचतो. हा व्हायरस स्थलांतरित पक्ष्यांमधून मानवांमध्ये येतो. पक्ष्यांमुळे हा व्हायरस इतर देशांमध्ये पसरू शकतो. WEE व्हायरसची लक्षणं काय आहेत?

WHO च्या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, 19 नोव्हेंबर 2023 रोजी WEE ची लागण झालेल्या रुग्णामध्ये डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा आणि ताप यांसारखी लक्षणे दिसून आली. यानंतर, रुग्णाला 24 नोव्हेंबर 2023 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णाला सुमारे 12 दिवस वेंटिलेशनवर ठेवण्यात आले आहे. त्यानंतर 20 डिसेंबरला रुग्णाला रुग्णालयातून सोडण्यात आले.  असा करा बचाव

1. हात आणि पाय चांगले झाकून ठेवा.2. घरातील कोणी आजारी पडल्यास त्याची काळजी घ्या.3. DEET, IR3535 किंवा Icaridin असलेली उत्पादने वापरू नका.4. दारे आणि खिडक्या घट्ट बंद ठेवा.5. मच्छरदाणीशिवाय झोपू नका.6. डास टाळण्यासाठी घरात कीटकनाशकाची फवारणी करा.7. गर्भवती महिला, लहान मुले आणि वृद्धांची विशेष काळजी घ्या.