शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुले जन्माला घाला मात्र, हॉटेलमध्ये आणू नका, दक्षिण कोरियात अनेक ठिकाणी बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 06:53 IST

South Korea: दक्षिण कोरिया हा जगातील सर्वात कमी जन्मदर असलेला देश आहे. महिलांनी अधिक मुले जन्माला घालावीत यासाठी सरकारने १६ वर्षांत १६ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत.

सेऊल : दक्षिण कोरिया हा जगातील सर्वात कमी जन्मदर असलेला देश आहे. महिलांनी अधिक मुले जन्माला घालावीत यासाठी सरकारने १६ वर्षांत १६ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. असे असताना अलीकडे अनेक कॅफे आणि रेस्टॉरंटमध्ये लहान मुलांना प्रवेश नाकारण्यात येत आहे. यामुळे मुलांना जन्म न देण्याच्या मानसिकतेत वाढ होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

प्रौढांना शांत वातावरण देणे हा त्यामागचा उद्देश आहे. एकट्या जेजू बेटावर अशी ८० ठिकाणे आहेत, जिथे मुलांना कॅफे आणि रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्यास मनाई आहे. देशभरात अशा झोनची संख्या ५०० हून अधिक आहे. 

हैंकुक रिसर्चच्या सर्वेक्षणानुसार, २०२१ मध्ये १० पैकी ७ लोक लहान मुलांना  प्रवेशास मनाई करण्याच्या बाजूने होते. येथील नेत्या योंग हाय-इन यांच्यामुळे अलीकडच्या काही दिवसांत अशा झोनच्या विरोधात निषेध वाढला आहे. योंग नुकत्याच परवानगी नसताना नॅशनल असेंब्लीच्या बैठकीत दोन वर्षांच्या मुलासह आल्या होत्या. त्या म्हणाल्या की,  अशा झोनला बेकायदेशीर घोषित करण्यासाठी संसदेत विधेयकावर चर्चा सुरू आहे.

मुले का नकोत?दक्षिण कोरियामध्ये जन्मदर केवळ ०.७८ आहे. मुलांच्या संगोपन आणि घरासाठी येणारा वाढता खर्च तसेच नोकऱ्यांची कमतरता आणि भविष्याची चिंता यामुळे मुले जन्माला घालण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे.

कुणा-कुणाला बंदी? आता येथे लहान मुलांना बंदी, वरिष्ठ नागरिकांना बंदीचे झोन तयार होत आहेत. मोठ्या प्रमाणात ५० वर्षे वयोगटातील लोकांसाठीही बंदीचे झोन आहेत. सेऊलमधील एक रेस्टॉरंट ४९ वर्षांवरील लोकांवर बंदी घातल्यानंतर लोकप्रिय झाले. या वयातील पुरुष महिला कर्मचाऱ्यांना त्रास देऊ शकतात, असा त्यांचा युक्तिवाद आहे. काही रेस्टॉरंट्सनी ‘नो-रॅपर झोन’, ‘नो-युट्यूबर झोन’ व अगदी ‘नो-प्रोफेसर झोन’ घोषित केले आहेत.

२०१२ पासून सुरुवात‘नो किड्स झोन’ची सुरुवात २०१२ मध्ये झाली. मुलाच्या आईने रेस्टॉरंटला जबाबदार धरले होते. अपघातापूर्वी लहान मूल इकडे तिकडे धावत असल्याचे कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये दिसल्यानंतर लोकांचे मत परिवर्तन होण्यास सुरुवात झाली.

टॅग्स :hotelहॉटेलSouth Koreaदक्षिण कोरिया