शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्क यांच्यातील वाद मिटला? मस्क यांनी घेतली माघार, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:50 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेतील उद्योगपती इलॉन मस्क यांच्यात वाद सुरू असल्याचे समोर आले.

मागील काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती इलॉन मस्क यांच्या वाद सुरू आहेत. मस्क यांनी ट्रम्प यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. दरम्यान, आता ट्रम्प आणि मस्क यांच्यातील वाद मिटल्याचे समोर आले आहे. मस्क यांनी आता या पोस्टबद्दल खेद व्यक्त केला आहे.

एलॉन मस्क-डोनाल्ड ट्रम्प यांचे ब्रेकअप; धमक्या अन् ‘यू टर्न’ सुरू, अमेरिकेचे राजकारण रंगात

इलॉन मस्क यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले की, "गेल्या आठवड्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दलच्या माझ्या काही पोस्टबद्दल मला वाईट वाटते. त्या खूप पुढे गेल्या." 

इलॉन मस्क-डोनाल्ड ट्रम्प यांचे ब्रेकअप

टेस्ला व स्पेसएक्सचे सर्वेसर्वा इलॉन मस्क यांच्या कंपन्यांशी असलेल्या करारांत कपात करण्याची घोषणा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. यावर अंतराळवीरांची, तसेच इतर साहित्याची आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर ने-आण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘ड्रॅगन कॅप्सूल’ची सेवाच बंद करण्याची धमकी मस्क यांनी सोशल मीडियावर दिली.

डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यातील अचानक झालेल्या या मतभेदामागील सर्वात मोठे कारण म्हणजे 'वन बिग ब्युटीफुल बिल' विधेयक आहे. इलॉन मस्क यांनी या विधेयकावर टीका केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रत्युत्तर दिले. 'मस्क यांना हे विधेयक माहित होते.  त्यांनी सरकारी पद सोडेपर्यंत त्यांना त्यावर कोणताही आक्षेप नव्हता', असा दावा ट्रम्प यांनी केला. 

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क ट्रम्प प्रशासनाच्या अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सीचे प्रमुख म्हणून काम करत होते. इलॉन मस्क यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे दावे खोटे असल्याचे म्हटले. 'मला कधीही विधेयक दाखवण्यात आले नाही आणि ते रात्रीच्या अंधारात इतक्या वेगाने मंजूर झाले की काँग्रेसमधील कोणीही ते वाचूही शकले नाही', असं प्रत्युत्तर मस्क यांनी दिले होते.

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका