शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

मनासारखा निकाल हवा म्हणून न्यायाधीशांचा छळ, पाकच्या आयएसआयविरोधात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 06:49 IST

Pakistan Court: न्यायालयीन प्रकरणांमध्ये आयएसआय हस्तक्षेप करीत असल्याची तक्रार गेल्या मार्च महिन्यात इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कौन्सिलकडे केली होती.

लाहोर -  पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात तेथील लष्करी वास्तूंवर हल्ले केले होते. त्या प्रकरणांच्या खटल्यांचा आपल्याला अनुकूल असा निकाल द्यावा म्हणून गुप्तचर संस्था आयएसआय माझा व कुटुंबीयांचा छळ करीत असल्याची तक्रार पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाच्या न्यायाधीशानेच केली आहे.

या न्यायालयाचे न्यायाधीश मुहम्मद अब्बास यांनी लाहोर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मलिक शहजाद अहमद खान यांना लिहिलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे. पीटीआय पक्षाचे कार्यकर्ते यांच्या विरोधातील खटल्यांची सुनावणी न्यायाधीश मुहम्मद अब्बास यांच्यासमोर होत आहे. गेल्या आठवड्यात यापैकी एका प्रकरणाची सुनावणी  न्यायालयासमोर झाली. त्या सुमारास आयएसआयच्या गुप्तचर यंत्रणेने न्या. अब्बास यांना काही काळ ओलीस ठेवले होते. तसे या न्यायाधीशांनी पत्रात म्हटले आहे. 

न्यायालयीन प्रकरणांमध्ये आयएसआय हस्तक्षेप करीत असल्याची तक्रार गेल्या मार्च महिन्यात इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कौन्सिलकडे केली होती. (वृत्तसंस्था)

‘यंत्रणांचा हस्तक्षेप बंद व्हायला हवा’माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात खटल्यांचे निकाल द्यावेत, अशी आयएसआयची इच्छा आहे. गुप्तचर यंत्रणांचा न्यायालयीन यंत्रणेतील हस्तक्षेप कमी व्हावा म्हणून काय उपाययोजना करता येईल याचा तपशील पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयांकडून मागविला होता. दहशतवादविरोधी न्यायालयाचे न्यायाधीश मुहम्मद अब्बास यांनी केलेल्या तक्रारीनंतर लाहोर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अहमद खान यांनी पंजाबचे पोलिस महासंचालक डॉ. उस्मान अन्वर यांना समन्स जारी केले आहेत.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयPakistanपाकिस्तानCourtन्यायालयISIआयएसआय