शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘हज’साठी सौदी अरेबियात गेलेल्या यात्रेकरूंचा का झाला मृत्यू? कारण आलं समोर   

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 17:24 IST

Haj Yatra: सौदी अरेबियामधून येत असलेल्या वृत्तांनुसार हज यात्रेदरम्यान बहुतांश यात्रेकरूंचा येथील भयंकर गरमीमुळे मृत्यू झाला. हज यात्रेदरम्यान, यात्रेकरूंना ५१ डिग्री सेल्सियसहून अधिक तापमानाचा सामना करावा लागला. त्यात मागच्या आठवड्यात मक्का येथे ५१.८ डिग्री एवढ्या तापमानाची नोंद झाली होती.

सौदी अरेबियामध्ये हज यात्रेसाठी गेलेल्या शेकडो यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. १४ जून रोजी हज यात्रेला सुरुवात झाल्यापासून  या यात्रेदरम्यान, कडक उन्हाचा त्रास झालेल्या यात्रेकरूंचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर येत होते. त्यात अनेक यात्रेकरू रस्त्याच्या शेजारी व्हिलचेअरवर पडलेले दिसत होते. अनेक छायाचित्रांमधून यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याचं दिसत होतं. दरम्यान, हज यात्रेदरम्यान सुरू झालेल्या यात्रेकरूंबाबतच्या या अफवा यात्रा संपल्यानंतर खऱ्या असल्याचे समोर आले. तसेच हज यात्रेदरम्यान, एक हजारांहून अधिक यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली.

सौदी अरेबियामधून येत असलेल्या वृत्तांनुसार हज यात्रेदरम्यान बहुतांश यात्रेकरूंचा येथील भयंकर गरमीमुळे मृत्यू झाला. हज यात्रेदरम्यान, यात्रेकरूंना ५१ डिग्री सेल्सियसहून अधिक तापमानाचा सामना करावा लागला. त्यात मागच्या आठवड्यात मक्का येथे ५१.८ डिग्री एवढ्या तापमानाची नोंद झाली होती. याबाबत सौदी अरेबियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, उकाड्यामुळे थकवा आल्याच्या २७०० घटनांची नोंद झाली आहे. मात्र हा अहवाल मृत्यूचे आकडे समोर येण्यापूर्वीचा आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार हज यात्रेदरम्यान, मृत्यू झालेल्यांची संख्या १ हजारांहून अधिक झाली आहे. मृत्यू झालेल्या हज यात्रेकरूंमध्ये इजिप्त, इंडोनेशिया, सेनेगल, जॉर्डन, इराण, इराक, भारत आणि ट्युनिशिया या देशांमधील हज यात्रेकरूंचा समावेश आहे. इजिप्तमधील सर्वाधिक ३०० यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. तर इंडोनेशियामधील १४० आणि भारतातील ९८ यात्रेकरूंचा सौदी अरेबियातील भयानक उष्म्यामुळे मृत्यू झाला.  

मागच्या काही वर्षांपासून हज यात्रेदरम्यान, सौदी अरेबियाकडून मिस्टिंग स्टेशन आणि डिस्पेंसरसारख्या सुविधा पुरवून उकाड्याचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र तरीही भयंकर उकाडा आणि अधिक वयामुळे बहुतांश हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. हज यात्रेला आलेले बहुताश यात्रेकरू वयस्कर होते, अशीही माहिती समोर येत आहे. दरम्यान, आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या मृत्यूंसाठी कुणाला जबाबदार धरायचं यावरून सौदी अरेबियामध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे.  

टॅग्स :Haj yatraहज यात्राsaudi arabiaसौदी अरेबियाInternationalआंतरराष्ट्रीय