शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

दहशतवादी हाफिजचा पक्ष AAT नावाने निवडणुका लढवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 13:18 IST

एएटी हा अत्यंत लहान पक्ष असून बहवालपूरचा मियाँ इहसान बारी हा पक्ष चालवतो.

इस्लामाबाद- हाफिज सईदचा मिल्ली मुस्लीम लीग हा पक्ष पाकिस्तानात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये उतरणार आहे. पाकिस्तानच्यापोल पॅनलने मिल्ली मुस्लीम लिगचा अर्ज दुसऱ्यांदा नाकारल्यावर हाफिजच्या उमेदवारांनी एएटी नावाने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षाची नोंदणी पाकिस्तानच्या निर्वाचन आयोगात यापुर्वीच झालेली आहे. बुधवारी एमएमएलच्या नोंदणीचा अर्ज नाकारला गेल्यानंतर हाफिजच्या उमेदवारांनी हा निर्णय घेतला आहे. हाफिज सईद हा जमात उद दवाचा दहशतवादी असून मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आहे.

एएटी हा अत्यंत लहान पक्ष असून बहवालपूरचा मियाँ इहसान बारी हा पक्ष चालवतो. त्यांनी दहा उमेदवार निवडणुकीसाठी उभे केले आहेत. या पक्षाचे चिन्ह खुर्ची असून त्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे. एमएमएलचा निवडणूक लढण्याचा अर्ज पाकिस्तानच्या निर्वाचन आयोगाच्या चार सदस्यीय खंडपिठाने नामंजूर केला. त्यानंतर या नव्या घडामोडी घडत आहेत.

एमएमएलचे अध्यक्ष सैफुल्ला खालिद हे हाफिजचे जावई आहेत असं गृहमंत्रालयाने निर्वाचन आयोगाला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे त्यामुळेच आयोगाने आमचा अर्ज मान्य केला नाही, खरंतर सैफुल्ला व हाफिज हे एकमेकांचे दूरचे नातेवाईकसुद्धा नाहीत असा दावा एमएमएलच्या लोकांनी केला आहे.  हे पत्र गुप्त राखले जावे अशी विनंती गृह मंत्रालयाने निर्वाचन आयोगाला केली होती मात्र खंडपिठातील एका सदस्याने आमच्या वकिलाला ही माहिती दिली अशी माहितीही एमएमएलने दिली आहे. निर्वाचन आयोगाच्या निर्णयाला वरिष्ठ न्यायालयांमध्ये आव्हान दिले जाईल असे एमएमएलचे प्रवक्ते तबिश कयुम यांनी सांगितले. पक्षाच्य़ा नोंदणीचा खटला अनेक महिने इस्लामाबाद उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले. एमएमएलची स्थापना गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात झाली. लष्कर ए तय्यबाशी आपला काहीही संबंध नसल्याचे या पक्षाने जाहीर केले होते.

टॅग्स :hafiz saedहाफीज सईदPakistanपाकिस्तानElectionनिवडणूक