शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वर्षात हाफिज सईदला पाकिस्तान सरकारकडून मोठा झटका, जप्त होणार संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 01:34 IST

26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदला पाकिस्तान सरकारनं मोठा दणका दिला आहे.

इस्लामाबाद : मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीज सईद यांच्यावर थेट हात न टाकता त्याच्या धर्मादाय संस्था आणि संपत्ती ताब्यात घेऊन आर्थिक नाड्या आवळण्याचा बेत पाकिस्तान सरकारने आखला आहे.हाफीजची संपत्ती कशी ताब्यात घेता येईल, यावर १९ डिसेंबर रोजी विविध प्रांतीय आणि संघीय सरकारच्या विविध खात्यांच्या अधिकाºयांच्या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. तसेच त्या दृष्टीने योजना प्रांतीय व संघीय सरकारला २८ डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे निदेश देण्यात आले होते.या उच्चस्तरीय बैठकीत सहभागी असलेल्या तीन वरिष्ठ अधिकाºयांनी एका वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. १९ डिसेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या दस्तावेजानुसार सईदच्या दोन धर्मादाय संस्थांची नावेआहेत. वित्तीय कृती गट ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था मनी लाँड्रिंग आणि दहशतवाद्यांच्या आर्थिक रसदविरुद्ध काम करते. या संस्थेने अनेकदा दहशतवादी संस्थांचे आर्थिक स्त्रोत बंद करण्याबाबत पाकिस्तानला सल्ला दिला होता.जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत या संघटना लष्कर-ए-तैयबाच्या मुखवटा असलेल्या संघटना आहेत, असे अमेरिकेने घोषित केले आहे. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यास लष्कर-ए तैयबाच जबाबदार असल्याचा आरोप भारत आणि अमेरिकेने केला आहे. अमेरिकेनेही हाफीज सईदला दहशतवादी घोषित केलेले आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :hafiz saedहाफीज सईदPakistanपाकिस्तान