शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हाफिज सईदला आम्ही दहशतवादीच समजतो, पाकनं कारवाई करावी, अमेरिकेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 14:37 IST

मुंबईतल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यातील मास्टर माइंड हाफिज सईदची तळी उचलल्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खकान अब्बासी यांना अमेरिकेनं खडे बोल सुनावले आहेत.

वॉशिंग्टन- मुंबईतल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यातील मास्टर माइंड हाफिज सईदची तळी उचलल्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खकान अब्बासी यांना अमेरिकेनं खडे बोल सुनावले आहेत. हाफिज सईदला आम्ही दहशतवादी समजतो, त्यामुळे पाकिस्ताननं त्याच्यावर कारवाई करावी, असं विधान अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हिथर नॉर्ट यांनी केलं आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खकान अब्बासी यांनी मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदला 'साहेब' असे संबोधले होते. एवढ्यावरच न थांबता त्यांनी हाफिज सईद साहेबांविरोधात पाकिस्तानात कोणताही गुन्हा दाखल नाही, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं. पाकिस्तानमधल्या जिओ टीव्हीनं काल घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी ही मुक्ताफळं उधळली होती. हाफिज सईद साहेबांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसल्यानं आम्ही त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करू शकत नाही. कोणी तरी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवल्यास आम्ही कारवाई करू शकतो, असंही शाहीद खकान अब्बासी म्हणाले होते. त्याच पार्श्वभूमीवर अमेरिकेनं पाकिस्तानला इशारा दिला आहे. हाफिज सईदवर कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करावी, असंही हिथर नॉर्ट यांनी सुनावलं आहे.मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या हाफिज सईद याला संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी घोषित केले होते. मात्र पाकिस्तानमध्ये राजकारणी आणि लष्कराकडून त्याला अद्यापही पाठिंबा मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी हाफिझ सईदची बाजू घेतल्यानंतर आता पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी हाफिस सईदची तळी उचलताना त्याने प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाप्रमाणेच काश्मीर समस्या सोडवण्यासाठी सक्रिया भूमिका घेतली आहे, असे बाजवा यांनी म्हटले होते. 

टॅग्स :AmericaअमेरिकाPakistanपाकिस्तानUSअमेरिका