शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

व्यायाम करताना गुप्तांग अडकले 2.5 किलो वजनाच्या प्लेटमध्ये...अन्

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 15:15 IST

चुकीचा व्यायाम अनेकदा घातक ठरतो, यामुळे अनेकदा व्यायाम करणाऱ्यांना दुखापतही होते. व्यायामादरम्यान घडलेली एक विचित्र घटना समोर आली आहे...

बर्लिन, दि. 18 - व्यायामाने शरीर तंदुरूस्त राहते. मन ताजेतवाने राहते. त्यामुळे व्यायाम हा आपला नित्याचा कार्यक्रम असला पाहिजे असे आपण अनेकवेळा म्हणतो.  नियमित व्यायाम करण्यामुळे शरीराचे स्नायू सुदृढ आणि बलवान होतात.  मात्र चुकीचा व्यायाम अनेकदा घातक ठरतो, यामुळे अनेकदा व्यायाम करणाऱ्यांना दुखापतही होते. व्यायामादरम्यान घडलेली एक विचित्र घटना समोर आली आहे. जर्मनीमधील वॉर्म शहरात एका व्यक्तीचं गुप्तांग वजनाच्या प्लेटच्या होलमध्ये अडकलं. मात्र ही वजनाची प्लेट या व्यक्तीच्या गुप्तांगात कशी अडकली हे अद्याप समजू शकलेले नाही.

जर्मनीतील डच न्यूज एजन्सीनुसार व्यायाम करत असताना त्या व्यक्तीचे गुप्तांग 2.5 किलो वजनाच्या प्लेटमध्ये अडकले. गुप्तांगात वजनाची प्लेट अडकल्यानंतर तेथील उपस्थितांना या व्यक्तीला अवघडलेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात गेल्यानंतर ती प्लेट गुप्तांगातून वेगळी कशी करायची असा प्रश्न डॉक्टरांना पडला. कारण ती प्लेट गुप्तांगापासून वेगळी करण्यासाठी गरजेची साधनं तेथे उपलब्ध नव्हती. म्हणून मदतीसाठी तेथे अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आलं. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ग्राईंडर आणि हायड्रॉलिक कटरच्या साहाय्याने ती प्लेट कापून काढली. जवळपास तीन तासांच्या प्रयत्नानंतर पाच तुकडे करून ती प्लेट त्या व्यक्तीच्या गुप्तांगापासून वेगळी करण्यात आली.

या ऑपरेशन नंतर फायर फाइटर्सनं ही सर्व घटना फेसबुक पेजवर शेअर केली. यामध्ये गुप्तांगात अडकलेल्या प्लेट्सच्या तुकड्याचे फोटो शेअर करताना त्यांनी वार्निंगही दिली.  अशा घटनेची कोणीही पुनरावृत्ती करु नका अशा प्रकारचे आवाहन त्यांनी या पोस्टमध्ये केलं.