पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पुन्हा एकदा गोंधळ सुरू झाला आहे. अज्ञात बंदूकधाऱ्यांनी पंजाबमधील पाच जणांना प्रवासी बसमधून खाली ओढून गोळ्या घालून ठार मारले. या हल्ल्यात जखमी झालेल्या आणखी एका प्रवाशाचा नंतर मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रांतातील ग्वादर जिल्ह्यात हा हल्ला झाला तेव्हा बंदूकधाऱ्यांनी रात्रीच्या वेळी कलमत भागात कराचीला जाणाऱ्या बसमधील पाच प्रवाशांची हत्या केली.
या देशांतील लोक झपाट्याने सोडतायत आपला धर्म, दोन धर्मांना सर्वाधिक फटका; अशी आहे भारताची स्थिती!
६ जणांचा मृत्यू
एका जखमी प्रवाशाचा नंतर मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या सहा झाली. बंदूकधाऱ्यांनी प्रवाशांची ओळखपत्रे तपासल्यानंतर त्यांची हत्या केली आणि इतर तिघांना घेऊन गेले.
मिळालेल्या माहितीनुसार, देशाच्या पंजाब प्रांतातील असल्याचे म्हटले आहे. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही, पण जातीय बलुच अतिरेकी गटांनी यापूर्वी पंजाबमधील लोकांवर हल्ले केले आहेत.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी हल्ल्याचा निषेध केला
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध केला. संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आणि जबाबदार असलेल्यांवर खटला चालवण्याचे निर्देश दिले. अहवालानुसार, राष्ट्रपती आसिफ अली झरदारी म्हणाले, 'दहशतवादी हे देशाच्या विकासाचे आणि बलुचिस्तानच्या समृद्धीचे शत्रू आहेत.' त्यांना बलुचिस्तानमध्ये प्रगती दिसत नाही.
काही दिवसापूर्वीच ४४० प्रवाशांना घेऊन जाणारी जाफर एक्सप्रेस बलुच लिबरेशनने अडवली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एक हल्ला करण्यात आला आहे.
या अपहरणात १८ सुरक्षा कर्मचाऱ्यांसह २६ ओलिसांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सैन्याने सर्व ३३ दहशतवाद्यांना ठार मारले आणि ३५४ ओलिसांची सुटका केली. तेव्हापासून बलुचिस्तानात अनेक हल्ले झाले आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी चार पोलीस आणि चार कामगारांची हत्या केली.