शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आखातातील संघर्ष निर्णायक टप्प्यावर! ग्राउंड ऑपरेशनचा धोका अमेरिकेला की इराणला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 14:14 IST

US Israel Iran War: आक्रमक धोरणामुळे जागतिक अस्थिरतेची भीती वाढली आहे.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक

US Israel Iran War: आखातातील संघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, त्याचे रूप अधिक व्यापक आणि भीषण होण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेच्या आक्रमक धोरणामुळे जागतिक अस्थिरतेची भीती वाढली आहे. संभाव्य भूदल लष्करी कारवाईचे परिणाम किती दूरगामी ठरू शकतात, याचा हा वेध. अफगाणिस्तानात अमेरिकेने २.५ लाख सैन्य उतरवले होते. त्या तुलनेत आखातातील या कठीण भूप्रदेशात केवळ ५० हजार सैनिकांच्या बळावर अमेरिका इराणवर ताबा मिळवण्याचे स्वप्न पाहत आहे. हे शक्य होईल?

आखातामध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाने आता दुसर्‍या महिन्यात प्रवेश केला आहे. आज संपूर्ण जगासमोर एकच कळीचा प्रश्न आहे, तो म्हणजे हा संघर्ष आता शांततेच्या मार्गाने सुटणार की अधिक चिघळत जाणार? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दररोज वेगवेगळी विधाने करत असल्याने याविषयीचा संशयकल्लोळ कमी होण्यापेक्षा अधिकच वाढत चालला आहे. 

अलीकडे ट्रम्प यांनी केलेली विधाने या युद्धाची पुढील दिशा दर्शवणारी आहेत. ट्रम्प यांनी १ एप्रिल रोजी केलेल्या वक्तव्यांमध्ये पुन्हा एकदा विजयाचा दावा करतानाच होर्मुझची सामुद्रधुनी उघडली जाईल, तेव्हाच आम्ही इराणच्या युद्धविरामाच्या विनंतीचा विचार करू. ही सामुद्रधुनी उघडली नाही, तर आम्ही इराणचा विनाश करणं सुरूच ठेवू, असे म्हटले आहे. व्हाइट हाऊसच्या ‘क्रॉस हॉल’मधून केलेल्या भाषणात ट्रम्प यांनी इराणमधील अमेरिकन लष्कराची मोहीम आता अंतिम टप्प्यात आहे. येणार्‍या दोन ते तीन आठवड्यांत आम्ही इराणवर इतके भीषण हल्ले करू की, त्यांना पुन्हा अश्मयुगात जावे लागेल, अशा कठोर शब्दांचा वापर केला आहे. याचा अर्थ अगदी स्पष्ट असून अमेरिका आणि इस्रायलकडून या पुढील काळातही हे युद्ध सुरू ठेवण्यात येणार आहे. इराणची संपूर्ण आधुनिक व्यवस्था मोडीत निघेल आणि तिथली साडेआठ कोटी जनता पुन्हा पाषाणयुगाच्या स्थितीत ढकलली जाईल, अशा प्रकारचा भयावह हल्ला करण्याची तयारी अमेरिका करत असून ही एका मोठ्या मानवी संहाराची पूर्वसूचना आहे. अमेरिकेकडून अशा प्रकारची टोकाची भूमिका घेतली जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. २००१ मध्ये अमेरिकेवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी ‘क्रुसेड’ म्हणजेच धर्मयुद्ध असा शब्द वापरला होता. आज २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा अमेरिकेच्या नेतृत्वाकडून तशाच प्रकारची आक्रमक आणि धार्मिक संदर्भ असलेली भाषा वापरली जात आहे. इराण हा केवळ एक देश नसून ती एक प्राचीन संस्कृती आहे. यापूर्वीच्या कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी- मग ते बिल क्लिंटन असोत, बराक ओबामा असोत किंवा ज्यो बायडन - इराणवर थेट लष्करी कारवाई करण्याचे धाडस केले नव्हते. त्यांनी नेहमीच चर्चेतून किंवा आर्थिक निर्बंधांच्या माध्यमातून इराणवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. कारण इराणसारख्या देशाला लष्करी बळावर नमवणे हे आजवर ‘मिशन इम्पॉसिबल’ मानले गेले आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी हे सर्व संकेत धुडकावून लावत थेट युद्धाचा मार्ग स्वीकारला आहे. हा संघर्ष चिघळला तर दुसर्‍या महायुद्धानंतर आली होती तशी जागतिक आर्थिक महामंदी पुन्हा एकदा जगाला कचाट्यात घेईल. 

ट्रम्प हा धोका का पत्करत आहेत? अमेरिकेचा मुख्य उद्देश इराणवर संपूर्ण ताबा मिळवणे हा नसून, ‘खर्ग आयलंड’वर ताबा मिळवणे आहे. हे बेट इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जगातील २०% तेलाचा साठा इराणकडे आहे. बहुतांश निर्यात याच बेटावरून होते. वर्षाला ६० अब्ज डॉलर्सची कमाई इराणला यातून मिळते. जर अमेरिकन मरीन्सनी हे बेट ताब्यात घेतले, तर  इराणसाठी तो मोठा धक्का ठरेल. याउलट ट्रम्प यांना मोठे ‘बार्गेनिंग टूल’ ठरेल. 

७०%जनतेचा पाठिंबा इराक,  अफगाणिस्तानातील ऑपरेशन्सच्यावेळी अमेरिकन अध्यक्षांना होता. ६६%जनता आज ट्रम्प यांच्या लष्करी हस्तक्षेपाच्या विरोधात आहे.३६%पर्यंत ट्रम्प यांचेरेटिंग खालीआले आहे. 

अमेरिका पुन्हा तोंडघशी पडणार का?अमेरिकेने यापूर्वी कोरिया, व्हिएतनाम, सोमालिया, अफगाणिस्तान आणि इराकमध्ये अशाच प्रकारची ‘ग्राउंड ऑपरेशन्स’ केली आहेत. १९५० मध्ये कोरियन वॉरच्या वेळी अमेरिकेने ग्राऊंड फोर्सेस ऑपरेशन राबवले होते. त्या संघर्षातून उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया हे दोन देश तयार झाले. आज या उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग ऊन अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रे विकसित करुन जगाला वेठीस धरताहेत. म्हणजेच अमेरिकेने राबवलेल्या या ऑपरेशनमधून फारसे काही निष्पन्न झाले नाही.१९६० मध्ये व्हिएतनाम युद्धात अमेरिकेचे दुसरे ग्राऊंड ऑपरेशन्स चालले. हा संघर्ष चार ते पाच वर्षे चालला. त्याची प्रचंड मोठी किंमत अमेरिकेला चुकवावी लागली. साधारणतः ५८ हजार अमेरिकन सैनिक  या युद्धात मारले गेले. आफ्रिकेतील सोमालिया या देशामध्ये अमेरिकेने अशाच प्रकारचे ऑपरेशन राबवले होते; पण त्याही संघर्षात २२ अमेरिकन नागरिक मारले गेले. विसाव्या शतकात २००१ मध्ये अफगाणिस्तानातील तालिबानी राजवट उलथवून टाकण्यासाठी अमेरिकेने लष्करी हस्तक्षेप केला होता. साधारणतः २० वर्षे चाललेल्या या मिशनमधूनही फारसे काही हाताशी लागले नाही. कारण २०२१ मध्ये अमेरिकन सैन्य माघारी गेल्यावर तेथे पुन्हा तालिबानचे शासन प्रस्थापित झाले आहे. इराकमध्ये सद्दाम हुसेनचा पाडाव करण्यासाठी अमेरिकन सैन्य घुसवण्यात आले; पण त्यातूनही काही साध्य झाले नाही. इराणची परिस्थिती या सर्व देशांपेक्षा वेगळी आणि आव्हानात्मक आहे. भौगोलिकदृष्ट्या इराण हा व्हिएतनामपेक्षा पाच पटीने, तर  इराक आणि अफगाणिस्तानपेक्षा दुप्पट मोठा आहे. इराणचा भूप्रदेश अत्यंत डोंगराळ आणि कठीण आहे, जो अफगाणिस्तानच्या ‘टेरेन’ची आठवण करून देणारा आहे. हे अमेरिकेला जास्त भारी पडू शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Gulf Conflict at a Critical Stage: Risk to US or Iran?

Web Summary : The Gulf conflict intensifies, raising fears of wider war due to US aggression. Military action's impact is questioned, comparing it to Afghanistan. Trump's threats to Iran escalate tensions, risking global economic crisis. Kharg Island is key for US control, but ground operations face challenges, mirroring past failures.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर