शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

केस पकडून खेचत नेलं, लाथा-बुक्क्या मारल्या; लग्नाच्या दिवशीच पतीने केली नवरीची हत्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 16:30 IST

Crime News : 25 वर्षीय स्टीफन डोलगिखने त्याच्या होणाऱ्या पत्नीची मारहाण करत हत्या केली. त्यानंतर 36 वर्षीय ओक्साना पोलुडेंटसेवाचा मृतदेह एका खड्ड्यात फेकला होता.

 Crime News : एका नवरदेवाने लग्नाच्या दिवशीच पाहुण्यांसमोर नवरीची बेदम मारहाण करत हत्या केली. नवरदेवाला संशय होता की, त्याची पत्नी त्याला दगा देत आहे. याप्रकरणी त्याला 18 वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. ही घटना रशियातील एका गावातील आहे.

25 वर्षीय स्टीफन डोलगिखने त्याच्या होणाऱ्या पत्नीची मारहाण करत हत्या केली. त्यानंतर 36 वर्षीय ओक्साना पोलुडेंटसेवाचा मृतदेह एका खड्ड्यात फेकला होता. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात घडलेल्या या घटनेसाठी स्टीफनला नुकतीच शिक्षा सुनावण्यात आली.

'द मिरर'नुसार, स्टीफनने गावातील घरात लग्न समारंभ आयोजित केला होता. यादरम्याने त्याने नवरी ओक्सानाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली होती. तिचे केस पकडून तिला खेचत नेलं आणि डोक्यावरही अनेकदा वार केला. या हल्ल्यात ओक्सानाचा जीव गेला. हा सगळा प्रकार बघून लग्नात आलेले पाहुणे घाबरले होते. त्यांनी लगेच पोलिसांना सूचना दिली. ज्यानंतर स्टीफनला अटक करण्यात आली. त्यावेळी तो नशेत होता.

या केसचा तपास करत असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, स्टीफन आधीही हत्येच्या केसमध्ये तुरूंगात गेला होता. जेव्हा तो तुरूंगात होता तेव्हा त्याची मैत्री ओक्सानासोबत झाली होती. ओक्सानाला वाटलं होतं की, स्टीफनला सुधारण्यात ती त्याची मदत करू शकते. त्यामुळे तो सुटेपर्यंत तिने त्याची वाट पाहिली. त्यानंतर ती लग्नासाठीही तयार झाली.

पण लग्नाच्या दिवशीच स्टीफनने ओक्सानाची हत्या केली होती. रिपोर्टनुसार, स्टीफनने हत्येचा गुन्हा कबूल केला. कथितपणे लग्नात आलेल्या एका पाहुण्याबाबत त्याला ईर्ष्या वाटत होती. त्याला वाटत होतं की, ओक्साना पाहुण्यासोबत चुकीच्या पद्धतीने वागत आहे. ज्यामुळे तो संतापला आणि त्याने हे कृत्य केलं.

टॅग्स :russiaरशियाCrime Newsगुन्हेगारी