शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

जिद्द, कष्ट, प्रामाणिकपणा, सौजन्य, ग्राहकसेवा या पंचसूत्रीमुळे उत्तुंग यश : मसालाकिंग डॉ. धनंजय दातार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 17:56 IST

डॉ. दातार यांनी लिहिलेल्या ‘मसालाकिंग - ए जर्नी ऑफ मेमॉयर्स’ या इंग्रजी आत्मचरित्राचे दुबईत प्रकाशन.

दुबई : दुबईमध्ये ३८ वर्षांपूर्वी वडिलांनी थाटलेल्या लहानशा किराणा दुकानात मदत करायला मी भारतातून आलो तेव्हा माझ्या खिशात १० दिऱ्हॅमच्या केवळ तीन नोटा होत्या. या कर्मभूमीने माझी खडतर परीक्षा घेतली आणि त्या कसोटीला उतरताच भरभरून देऊही केले. जिद्द, कष्ट, प्रामाणिकपणा, सौजन्य व ग्राहकसेवा या पंचसूत्रीमुळेच मला व्यवसायात उत्तुंग यश लाभले आणि एका सामान्य दुकानदारापासून ते मसालाकिंग बनण्यापर्यंत माझा प्रवास झाला, असे प्रतिपादन अल अदील या जागतिक समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी दुबईत केले.

अल अदील समूहाच्या ३८व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून डॉ. दातार यांनी लिहिलेल्या ‘मसालाकिंग - ए जर्नी ऑफ मेमॉयर्स’ या इंग्रजी आत्मचरित्राचे प्रकाशन दुबईतील ॲड्रेस हॉटेलमध्ये प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते व केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत झाले. याप्रसंगी डॉ. धनंजय दातार यांच्या पत्नी वंदना, पुत्र हृषिकेश आणि रोहित यांच्यासह दुबईतील विविध क्षेत्रांतील मान्यवर, ‘अल अदील’चा कर्मचारीवर्ग व ग्राहक उपस्थित होते. 

डॉ. दातार म्हणाले, बालपण गरिबीत गेले. दहावीला मी गणितात पाच वेळा नापास झालो. वडिलांना अखेरच्या नोकरीत दुबईतील कंपनीतून निवृत्त होण्याच्या उंबरठ्यावर व्यवसायाची संधी दिसली. दुबईत गेलेल्या भारतीयांना पिठे, मसाले, लोणची, चटण्या तेथे सहज मिळत नाहीत हे लक्षात येताच त्यांनी एक लहानसे दुकान उघडले. बाबांची भागीदारीत फसवणूक झाल्याने त्यांना मदत करण्यासाठी मी दुबईला गेलो आणि उद्योजकता माझ्या आयुष्यात आली.

भारतीय तरुणांमधून हजारो उद्योजक निर्माण व्हावेतआयुष्यात कोणतेही काम छोटे-मोठे नसते व पूर्वग्रह धंद्यात आणून चालत नाही, हा मोलाचा उपदेश मला एका जैन व्यापाऱ्याने केला. कामावर लक्ष केंद्रित करून मी आखाती देशांमध्ये ५० सुपर स्टोअर्सची साखळी विणू शकलो. यश व समृद्धीचे स्वप्न बघणाऱ्या भारतीय सर्वसामान्य तरुणांमधून हजारो उद्योजक निर्माण व्हावेत हे माझे स्वप्न आहे. अशा नवउद्योजकांना प्रेरणा मिळावी म्हणून मी आत्मचरित्र लिहिले आहे, असेही दातार म्हणाले.

टॅग्स :Dubaiदुबई