नाती गेली खड्ड्यात, तिघांना फक्त पैसा हवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 06:05 AM2021-04-28T06:05:45+5:302021-04-28T06:10:02+5:30

क्षुल्लक कारणावरून भांडत बसलेले कुटुंबीय आणि त्यामुळे वर्षानुवर्षे कोर्टात प्रलंबित असलेले खटले हे दृश्य आपल्याकडे नवीन नाही.

The grandchildren are in the pit, the three of them just want money! | नाती गेली खड्ड्यात, तिघांना फक्त पैसा हवा !

नाती गेली खड्ड्यात, तिघांना फक्त पैसा हवा !

Next

प्रत्येकाच्या आयुष्यात पैशाचं स्थान मोठं असतं. पैसा महत्त्वाचा असतोच; पण पैसा सर्वस्व नसतो, नसावा. आपली नाती, आपले जिव्हाळ्याचे संबंध या पैशांपेक्षा कितीतरी मौल्यवान असतात. पण पैसा, संपत्ती माणसांच्या नात्यात दरी निर्माण करतात हे खरंच. त्यामुळे गावोगावी, ठिकठिकाणी पैसा आणि संपत्तीवरून कज्जे-खटले चालू असतात. यात रक्ताची सख्खी नातीही मागे नाहीत. किंबहुना भारतात तर कौटुंबिक भांडणाचं प्रमाण खूप मोठं आहे. त्यामुळे एकमेकांचे जीवही घेतले गेले आहेत.

क्षुल्लक कारणावरून भांडत बसलेले कुटुंबीय आणि त्यामुळे वर्षानुवर्षे कोर्टात प्रलंबित असलेले खटले हे दृश्य आपल्याकडे नवीन नाही. काही खटले तर अगदी पिढ्यान‌्‌पिढ्या चालू असल्याचेही आपल्याला माहीत आहे. यात नाती तर कायमची दुरावतातच, पण ज्या कारणासाठी भांडण काढलं, त्यातलं ही काही कुणाला मिळत नाही, उलट हाती असलेला पैसा-अडका संपला, नव्यानं कर्ज काढावं लागलं आणि खोट्या प्रतिष्ठेपायी वर्षानुवर्षे कोर्टाच्या खेट्या माराव्या लागल्या, वकीलच त्यात गब्बर झाले,  हा अनुभवही नेहमीचाच !

इंग्लंडच्या न्यायालयात आलेला असाच एक खटला सध्या जगभरात खूप गाजतो आहे.  इंग्लंडमध्ये राहत असलेला फरहाद अख्मेदोव हा एक रशियन व्यावसायिक. आपल्या व्यवसायातून त्यानं करोडोची संपत्ती कमावली होती. त्याची बायको तातियाना. सुरुवातीला काही वर्ष व्यवस्थित गेली, त्यानंतर मात्र पती-पत्नींमध्ये भांडणं सुरू झाली. त्याचीच अपिरहार्य परिणिती म्हणजे घटस्फोट. एकमेकांशी पटत नसल्याने या दाम्पत्याने २०१६ मध्ये इंग्लंड आणि वेल्स उच्च न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. या दाम्पत्याला तैमूर नावाचा एक सज्ञान मुलगाही आहे. पण या घटनेला आणखी एक कंगोरा आहे. तेल आणि गॅसच्या व्यवसायात या कुटुंबानं करोडो युरोंची कमाई केलेली आहे. पुढच्या पन्नास पिढ्या बसून खातील एवढा पैसा त्यांच्याकडे आहे. देशविदेशात त्यांचा कारभार आहे. 

घटस्फोटाचा खटला न्यायालयात गेल्यानंतर न्यायाधीशांनी तातियानाचं म्हणणं योग्य मानून या दाम्पत्याला घटस्फोट मंजूर केला आणि फरहाद अख्मेदोव यांच्याकडे जेवढी संपत्ती आहे, त्यातील ४१ टक्के संपत्ती तातियानाला देण्याचा आदेश दिला. कोर्टाच्या या आदेशानं मात्र बाप आणि मुलगा दोघांचेही डोळे फिरले.  ही प्रचंड संपत्ती आपली आई एकटी घेऊन जाईल म्हणून बापाच्या कमाईतील बरीचशी संपत्ती मुलानं दडवून ठेवली. हा पैसा आईला मिळू नये यासाठी त्यानं प्रचंड लांड्यालबाड्या आणि लपवाछपवी केली.

दरम्यान घटस्फोटानंतर आपल्याला मिळणार असलेली संपत्ती बरीच कमी असणार असल्याचं तातियानाच्या ही लक्षात आलं. त्यामुळे तिनं पुन्हा कोर्टाकडे मागणी केली, की जेवढी संपत्ती मला मिळायला म्हणजे तेवढी मिळत नाही. घटस्फोटाची नुकसान भरपाई म्हणून आपल्याला ७० मिलियन युरो  आणखी मिळायला हवेत, अशी मागणी तिने केली.  अर्थातच तातियानानं मागणी केलेली वाढीव रक्कमच ६३१ कोटी रुपये असेल, तर मूळ रक्कम किती असावी याचा अंदाज  लावणंही मुश्कील. तातियानानं कोर्टात दावा केला की आपला ६५ वर्षीय पती फरहाद आणि मुलगा तैमुर यांनी संगनमताने खूप मोठी संपत्ती लपवून ठेवली. 

आपण कोणताही पैसा दडवला नसून आईचं म्हणणं खोटं असल्याचा दावा मुलगा तैमुर यानं केला. दुसरीकडे तातियानाचं म्हणणं होतं, आपला पती फरहाद याचा जन्म अजरबैजान येथे झाला आहे. तेल आणि गॅसच्या कारभारात त्यानं करोडोंची कमाई केली. त्याच बळावर नंतर तो रशियामध्ये सिनेटर झाला. २०१८ मध्ये अमेरिकन सरकारने जाहीर केलेल्या रशियन व्यवसाय आणि राजकीय नेत्यांच्या  यादीमध्ये ही फरहाद याचं नाव होतं.  

छानछोकी आणि ऐशोआरामाची सवय असलेल्या फरहाद यानं चेल्सी फुटबॉल क्लबचे मालक रोमन अब्रामोविच यांच्याकडून ११५ मीटर लांबीची आलिशान नौकाही खरेदी केली आहे. मालमत्ता लपवण्यासाठी फरहादनं आपली काही संपत्ती वेगवेगळे ट्रस्ट आणि कलासंग्रहांकडे ही हस्तांतरित केली. नंतर मुलगा तैमुर यानं मात्र सांगितलं की, आपल्या आईवडिलाचं पुनर्मिलन व्हावं यासाठीच आपण संपत्तीची माहिती दडवत होतो.  न्यायाधीश ग्वेनेथ नॉल्स यांनी मात्र  तातियानाच्या बाजूने निर्णय देताना लपवलेल्या संपत्तीतला हिस्साही तिला देण्याचा आदेश दिला.  

Web Title: The grandchildren are in the pit, the three of them just want money!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.