शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

बहरीनच्या जेलमधून 250 भारतीयांची सुटका होणार, मोदींनी मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 09:42 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर आहेत. मोदी यांना बहरिनचे राजे हमाद बिन इसा बिन सलमान अल खलिफा यांच्या हस्ते 'द किंग हमाद ऑर्डर ऑफ दि रेनेसान्स' हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

ठळक मुद्देमोदींना 'द किंग हमाद ऑर्डर ऑफ दि रेनेसान्स' हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. बहरीनच्या जेलमधून 250 भारतीयांची सुटका होणार आहे. मोदी यांच्या बहरीन भेटीनिमित्त तेथे विविध आरोपांखाली शिक्षा भोगत असलेल्या 250 भारतीय कैद्यांना माफी देण्यात आली

मनामा - पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर आहेत. मोदींना बहरीनचे राजे हमाद बिन इसा बिन सलमान अल खलिफा यांच्या हस्ते 'द किंग हमाद ऑर्डर ऑफ दि रेनेसान्स' हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. भारत आणि बहरीन यांच्यातील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल शनिवारी (24 ऑगस्ट) मोदींचा सन्मान करण्यात आला आहे. मोदी यांच्या बहरीन भेटीनिमित्त तेथे विविध आरोपांखाली शिक्षा भोगत असलेल्या 250 भारतीय कैद्यांना माफी देण्यात आली आहे. त्यामुळे बहरीनच्या जेलमधून 250 भारतीयांची सुटका होणार आहे. 

पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने एक ट्वीट करून याबाबत माहिती देण्यात आली आहे. 'दया आणि मानवतेच्या भावनेने बहरीन सरकारने विविध आरोपांखाली शिक्षा भोगत असलेल्या 250 भारतीय कैद्यांना माफ केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी या निर्णयाबाबत बहरीनच्या नेत्यांचे आभार मानले आहेत.' असं ट्वीट करण्यात आले आहे. 'बहरीनचे राजे आणि त्यांच्या शाही कुटुंबाच्या या निर्णयाचे स्वागत आणि त्यांचे आभार' असं ट्वीट मोदी यांनी केलं आहे. पुरस्कारामुळे माझा सन्मान झाला तसेच भारतीयांच्या वतीने मी हा पुरस्कार नम्रपणे स्वीकारतो. हा संपूर्ण भारताचा सन्मान आहे. बहरीनबरोबर भारताचे कायमच व्यापारी संबंध राहिले आहेत. बहरीन साम्राज्य व भारत यांच्यातील घनिष्ठ व मैत्रीपूर्ण संबंधांना मिळालेली ही मान्यता आहे असं देखील मोदी यांनी म्हटलं आहे. 

पंतप्रधान मोदींनी बहरीनमधल्या भारतीयांना संबोधित केलं आहे. ते म्हणाले, भारताच्या पंतप्रधानाच्या स्वरूपात बहरीनमध्ये येण्याची संधी मिळाली, असं तुमचं प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. भारतातली विविधता हीच त्याची शक्ती आहे. मी श्रीनाथजींच्या मंदिरात जाऊन तुमच्या देशाच्या समृद्धी आणि शांतीसाठी प्रार्थना करणार आहे. हे पूर्ण क्षेत्रातील जुनं मंदिर आहे. गल्फ देशांतही कृष्ण कथा ऐकण्याची परंपरा आजही अबाधित आहे. भारतीयांचं भगवान कृष्णाप्रति विशेष प्रेम आहे. बहरीनच्या प्रगतीत भारतीयांचं मोठं योगदान आहे. आपलं नातं फक्त सरकारांचं नाही, तर संस्कारांचं आहे.

मला पाच हजार वर्षं जुन्या संबंधांना पुन्हा चालना द्यायची आहे. बहरीनमधल्या भारतीयांना भेटण्यासाठीच मी आलो आहे. बहरीनमधल्या भारतीय समुदायाला न्यू इंडियासाठी आमंत्रित करत आहे. बहरीनबरोबर भारताचे कायमच व्यापारी संबंध राहिले आहेत. पुढे ते म्हणाले, तुम्ही तुमच्या भारतातल्या कुटुंबीयांना विचारल्यास तेसुद्धा तुम्हाला भारतातल्या वातावरणात आता बदल झाल्याचं सांगतील. तुम्हाला भारताला बदललेलं पाहायचं आहे की नाही?, भारत आता प्रगतीची एक एक शिखरं पादाक्रांत करत चालला आहे. 

भारताचं चांद्रयान 2 सुद्धा 7 सप्टेंबर रोजी चंद्रावर उतरणार आहे. या प्रगतीमुळे जगभरात भारताच्या अवकाश मोहिमेचीच चर्चा आहे. भारतानं एवढ्या कमी खर्चात चंद्रावर यान कसं काय पाठवलं, यानं सगळं जगच आश्चर्यचकित झालं आहे. भारतानं येत्या 5 वर्षांत अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरची करण्याचं लक्ष्य ठेवल्याचंही मोदींनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितलं आहे. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत