गुगलच्या चुकीने यूट्युबवर आला पॉर्नचा पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2017 05:52 PM2017-01-18T17:52:01+5:302017-01-18T17:52:01+5:30

सेक्शुअल कॉन्टेटबाबत यूट्युबचे नियम कडक असले तरी या नियमातून पळवाटा काढून गुगलची ही सेवा पॉर्न व्हिडिओंनी

Google's Flick of Flick After YouTube's Wrong Youtube | गुगलच्या चुकीने यूट्युबवर आला पॉर्नचा पूर

गुगलच्या चुकीने यूट्युबवर आला पॉर्नचा पूर

Next

 ऑनलाइन लोकमत

 न्यूयॉर्क, दि. 18 -  गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या इंटरनेटच्या वापरामुळे पॉर्न साइटचा धंदाही तेजीत आला  आहे.  आतातर हा पॉर्न कॉन्टेन्ट यूट्युबवरही अपलोड केला जाऊ लागला आहे.  सेक्शुअल कॉन्टेटबाबत  यूट्युबचे नियम कडक असले तरी या नियमातून पळवाटा काढून गुगलची ही सेवा पॉर्न व्हिडिओंनी भरली आहे. यूट्युबर केवळ पॉर्न व्हिडिओज नाहीत तर कॉपिराइट्चे उल्लंघन करून पायरेटेड कॉन्टेन्टसुद्धा अपलोड केले जात आहे.  
हा सर्व घोळ गुगलच्या एका चुकीमुळे होत आहे. सर्वसाधारणपणे यूट्युबवर एखादा व्हिडिओ अपलोड करण्यात आल्यानंतर गुगलची होस्टिंग सर्व्हिस कॉन्टेन्ट आयडी सॉफ्टवेअरवरून सदर व्हिडिओ स्कॅन करते, तसेच त्या व्हिडिओच्या कॉपीराइटची पडताळणी केली जाते. या प्रक्रियेदरम्यान कॉपीराइटचा भंग करणारे तसेच सेक्स रूलमध्ये दोषी ठरलेले व्हिडिओ हटवले जातात.  पण ही प्रक्रिया तेव्हाच अमलात आणली जाते जेव्हा हे व्हिडिओ पब्लिक कॅटॅगरीतून पब्लिश केले जातात. पण जेव्हा हे व्हिडिओ पब्लिक व्ह्युइंगमधून पब्लिश केले जात नाही तेव्हा असे व्हिडिओ फिल्टर होत नाहीत. गुगलच्या याच त्रुटीमुळे पोर्न व्हि़डिओना युट्यूबर चंचूप्रवेश करण्याची संधी मिळते, अशा पद्धतीने पब्लिश केलेले व्हिडिओ नंतर अन्य साइट्सवर यूट्युब प्लेअरच्या माध्यमातून एम्बेड केले जातात. तिथे असे व्हिडिओ कुणीही पाहू शकतो. 
इंग्रजी संकेतस्थळ डेलीस्टारने या संदर्भात वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार कॅलिफोर्नियातील प्रौढ चित्रपट बनवणाऱ्या ड्रीमरूम प्रॉडक्शनचे म्हणणे आहे की, आमचे कॉन्टेन्ट डाऊनलोड करून यूट्युबवर अपलोड केले जात आहेत. आम्ही याबाबत युट्युबला वेळोवेळी कळवले जात आहे, पण  यूट्युबकडून खूपच उशिराने प्रतिसाद दिला जात आहे. 

Web Title: Google's Flick of Flick After YouTube's Wrong Youtube

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.