शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांपूर्वी लागू केला होता जीएसटी; 'या' पंतप्रधानांना पत्कारावा लागला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 14:55 IST

जीएसटी हटवण्याचं आश्वासन देणारा उमेदवार विजयी

मुंबई: देशात 1 जुलै 2017 पासून वस्तू आणि सेवा कर लागू झाला. सहा टप्प्यांमध्ये लागू करण्यात आलेला हा कर अनेकदा वादग्रस्त ठरलाय. या कराच्या अंमलबजावणीवरुनही मोदी सरकारवर टीका झाली होती. मलेशियात हाच कायदा 2015 मध्ये लागू झाला. हा कायदा लागू करणाऱ्या मलेशियाच्या पंतप्रधानांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागलाय. याआधी कॅनडामध्ये जीएसटी लागू करणाऱ्या सरकारलाही सत्ता गमवावी लागली होती. मलेशियातील सार्वत्रिक निवडणुकीत विविध वादांमुळे चर्चेत राहिलेल्या पंतप्रधान नजीब रझाक यांच्यासमोर 92 वर्षांच्या महातिर मोहम्मद यांचं आव्हान होतं. बुधवारी सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये महातिर मोहम्मद यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. त्यांनी रझाक यांचा पराभव केला. रझाक यांनी 1 एप्रिल 2015 मध्ये जीएसटी लागू केला होता. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत रझाक यांनी जीएसटी लागू करण्याचा निर्णय अतिशय कठीण होता, असं म्हटलं होतं. 'जीएसटी लागू केल्यानंतर अनेक वस्तू आणि सेवा महाग होतील, याची कल्पना होती. मात्र देशहितासाठी हा निर्णय घेतला,' असं रझाक यांनी म्हटलं होतं. 92 वर्षांच्या महातिर यांनी रझाक यांच्या बॅरिसन नॅशनल आघाडीला निवडणुकीत पराभूत केलं. महातिर यांनी निवडणुकीत रझाक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. याशिवाय त्यांनी सत्तेवर येताच जीएसटी रद्द करण्याचं आश्वासनही दिलं होतं. मलेशियाच्या जनतेनं जीएसटी हटवण्यासाठी महातिर यांना कौल दिल्याचं मानलं जातंय. चीननं मलेशियात केलेल्या गुंतवणुकीचा पुनर्विचार करण्याची घोषणा महातिर यांनी केलीय.  

टॅग्स :GSTजीएसटी