शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

व्हर्जिनियातील सरकारी इमारतीत गोळीबार; १२ जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 04:47 IST

हल्लेखोर ठार, सहा जण जखमी; व्हर्जिनिया बीचच्या इतिहासातील सर्वाधिक विध्वंसक दिवस

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील एका महानगरपालिकेच्या इमारतीत पालिकेच्याच एका कर्मचाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १२ जण ठार, तर सहा जण जखमी झाले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत हल्लेखोरही ठार झाला आहे.अमेरिकेच्या दक्षिण किनारपट्टीवरील व्हर्जिनिया बीच शहरात ही घटना घडली. हल्लेखोराने शहरातील सार्वजनिक सुविधा इमारतीच्या (पब्लिक युटिलिटी बिल्डिंग) अनेक मजल्यांत धुमाकूळ घालत गोळीबार केला.

शहराचे पोलीस प्रमुख जेम्स केर्व्हेरा यांनी पत्रकारांना सांगितले की, हल्लेखोराने पोलिसांवरही गोळीबार केला. त्यातील एक गोळी एका पोलीस जवानाला लागली. तथापि, बुलेटप्रूफ जाकिटामुळे तो वाचला. हा जवान जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. व्हर्जिनिया बीच शहराचे महापौर बॉबी डायर यांनी घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, व्हर्जिनिया बीचच्या इतिहासातील हा सर्वाधिक विध्वंसक दिवस आहे. घटनेत सापडलेले लोक आमचे मित्र, सहकर्मी, शेजारी आणि सहकारी आहेत.

व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने सांगितले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. व्हर्जिनियाचे गव्हर्नर राल्फ नॉर्थम यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, व्हर्जिनिया राष्ट्रकुलसाठी हा एक भयंकर दिवस आहे.

तो महानगरपालिकेत अभियंता होताहल्लेखोराची ओळख पटली असून, डेवेन कार्डडॉक (४0), असे त्याचे नाव आहे. तो व्हिर्जिनिया बीच महानगरपालिकेच्या सार्वजनिक सेवा विभागात अभियंता होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो स्थानिक रस्ते प्रकल्पांसाठी माहिती अधिकारी म्हणूनही काम पाहत होता. तो एक नाराज कर्मचारी होता, असे व्हर्जिनिया सरकारच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :FiringगोळीबारAmericaअमेरिका