शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

प्रख्यात गोल्फपटू टायगर वुड्सच्या कारला भीषण अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 08:44 IST

Golfer Tiger Woods seriously injured in accident : जगप्रसिद्ध गोल्फपटू टायगर वुड्स मंगळवारी झालेल्या एका भीषण कार अपघातात गंभीर जखमी झाला आहे.

लॉस एंजेल्स - जगप्रसिद्ध गोल्फपटू टायगर वुड्स (Tiger Woods ) मंगळवारी झालेल्या एका भीषण कार अपघातात (Car Accident) गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या एजंटकडून मिळालेल्या माहितीनुसार वुड्सच्या पायामध्ये अनेक फ्रॅक्चर झाले आहेत. वुड्स आपली कार रोलसोव्हरला ड्राइव्ह करत असताना लॉस एंजेल्समध्ये हा अपघात झाला. अपघातानंतर वुड्सला कारमधून बाहेर काढण्यासाठी खूप अडचणी आल्या. हा अपघात इतका भीषण होता की, त्यामुळे कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. (Golfer Tiger Woods seriously injured in a car accident)मिळत असलेल्या माहितीनुसार टायगर वुड्सला खूप गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या अपघातामध्ये वुड्सच्या कारचे मोठे नुकसान झाले. वुड्सच्या कारच्या समोरील भागाचा चेंदामेंदा झालेला दिसत आहे. तसेच अपघातानंतर एअरबॅग उघडल्याचे दिसत आहे. तर कारचा दुर्घटनाग्रस्त भाग रस्त्याच्या शेजारी पडलेला दिसत आहे.

हा अपघात मंगळवारी सकाळी ७.१५ च्या सुमारास झाला. अपघात झाला तेव्हा वुड्स वेगाने गाडी चालवत होते. यादरम्यान वुड्सचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला.टायगर वुड्सचा समावेश जगभरातील सर्वश्रेष्ठ गोल्फपटूंमध्ये होतो. त्याने आतापर्यंत १५ प्रमुख गोल्फ अजिंक्यपद स्पर्धा जिंकल्या आहेत. वुड्स आधीच दुखापतींमुळे त्रस्त आहे. नुकतीच त्याने पाठदुखीपासून सुटका करून घेण्यासाठी पाचव्यांदा शस्त्रक्रिया केली होती. त्यातून सावरत असतानाच हा अपघात झाला. त्यामुळे आता त्याला दीर्घकाळ गोल्फच्या मैदानापासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :AccidentअपघातUnited Statesअमेरिका