मागील काही दिवसांपासून मध्य पूर्वेत तणाव सुरू आहे. इराण-अमेरिकेतील युद्धाला २१ दिवस पूर्ण झाले असून तणाव कमी होण्याऐवजी वाढत आहे. या युद्धात आखाती देशांना सर्वाधिक फटका बसला आहे. शुक्रवारी सकाळी, कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने सांगितले की, आज सकाळी मीना अल-अहमदी रिफायनरीवर ड्रोन हल्ले झाले, ज्यामुळे अनेक युनिट्सना आग लागली.
कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये लिहिले, "आज सकाळी मीना अल-अहमदी रिफायनरीवर ड्रोन हल्ले झाले, यामुळे अनेक युनिट्सना आग लागली आणि खबरदारीचा उपाय म्हणून सुविधेचा काही भाग बंद करावा लागला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
"अमेरिकेला लष्करी तळ देणे हे एक आक्रमक कृत्य"
अमेरिकेच्या लष्करी तळांना ब्रिटनने जागा दिला आहे. यावर आता इराणने ब्रिटनला इशारा दिला आहे. "अमेरिकेला लष्करी तळ वापरण्याची परवानगी देणे हे संघर्षात थेट सहभाग मानले जाईल, असा इशारा इराणने दिला.
आखाती देश धोक्यात
इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण आखाती प्रदेशाच्या ऊर्जा सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी, बुधवारी रात्री इस्रायलने इराणच्या दक्षिण पार्स गॅस क्षेत्रावर हल्ला केला, यामुळे इराणने कतारच्या रास लाफान औद्योगिक शहरावर हल्ला केला.
इराणच्या एका बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने उत्तर इस्रायलमधील एका मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला केला. इराणच्या क्षेपणास्त्राने हैफा तेल शुद्धीकरण संकुलाला लक्ष्य केले होते.
'जर पुन्हा इराणच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य केले, तर कोणताही संयम राहणार नाही. इस्रायली हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने आतापर्यंत आपल्या सैन्याचा केवळ एक छोटासा भाग वापरला आहे, असेही इराणचे परराष्ट्र मंत्री, सय्यद अब्बास अराघची म्हणाले
Web Summary : Amidst rising Middle East tensions, Iran warns Britain that allowing US military bases constitutes direct involvement in conflict. Recent attacks targeted Kuwait's oil refinery and escalating conflict puts Gulf energy security at risk, with threats of further retaliation from Iran.
Web Summary : मध्य पूर्व में बढ़ते तनाव के बीच, ईरान ने ब्रिटेन को चेतावनी दी है कि अमेरिकी सैन्य अड्डों की अनुमति देना संघर्ष में सीधी भागीदारी है। कुवैत की तेल रिफाइनरी पर हालिया हमले और बढ़ते संघर्ष से खाड़ी की ऊर्जा सुरक्षा खतरे में है, ईरान ने आगे जवाबी कार्रवाई की धमकी दी है।