शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

''डोनाल्ड ट्रम्पना शांततेचं नोबेल द्या''

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 08:55 IST

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाए इन यांची मागणी

सेऊल: उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाए- इन यांची गेल्या आठवड्यात भेट झाली. प्रदीर्घ काळानंतर दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चा सुरु झाल्याने जागतिक राजकारणात हा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. या दोन्ही देशांना शांततेसाठी बोलणी करण्यास प्रोत्साहन दिल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचे नोबेल द्यावं, अशी मागणी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून यांनी केलीय. गेल्या आठवड्यातील चर्चेत दोन्ही देशांनी संपूर्ण कोरिया अण्वस्त्ररहित करण्याच्या विचारावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झालं.आम्हाला फक्त शांतता हवी आहे. (त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या) ट्रम्प यांना नोबेल द्यायला हवं, असं मून आपल्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत म्हणाल्याचं ब्लू हाऊसच्या अधिकृत अधिकाऱ्यानं सांगितलं. ट्रम्प यांच्याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असणारे बराक ओबामा यांनाही शांततेचं नोबेल मिळालं होतं.आता ट्रम्प स्वत: किम जोंग उन यांना भेटणार आहेत. साधारणत: तीन ते चार आठवड्यांनी त्यांची भेट होण्याची शक्यता आहे. २०१७ हे वर्ष उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र चाचण्या आणि किम-ट्रम्प यांची एकमेकांना दिलेली प्रत्युत्तरे यामुळे गाजले होते. या परिस्थितीमुळे जग एका मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर असल्याची स्थिती निर्माण झाली होती. सुदैवानं हा तणाव निवळला असून पुढील प्रश्न चर्चेनं सोडवण्यावर एकमत झालंय. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पSouth Koreaदक्षिण कोरियाnorth koreaउत्तर कोरिया