शहरं
Join us  
Trending Stories
1
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
2
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
3
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
4
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
5
अर्जुन तेंडुलकसंदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
6
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
7
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
8
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार
9
स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा आणि द्या देशभक्तीच्या शुभेच्छा!
10
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
11
₹७५ वरून ₹५०० च्या पार ट्रेड करतोय हा शेअर, अचानक गुंतवणुकदारांचं स्वारस्य वाढलं, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
12
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
13
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
14
जगातील सगळ्यात लहान ५ मोबाइल फोन; अगदी माचिसच्या डबीतही लपवून ठेवू शकता!
15
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
16
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
17
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
18
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
19
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
20
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला

"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 15:50 IST

आता चीनला टक्कर देण्यासाठी त्याचा शत्रू देश तयार झाला आहे. या देशाने आता मूल जन्माला घालण्यासाठी तब्बल ६ लाख देण्याची घोषणा केली आहे.

काही दिवसांपूर्वी चीनने 'मूल जन्माला घाला आणि १ लाख रुपये मिळवा' अशी योजना आणली होती. आता चीनला टक्कर देण्यासाठी त्याचा शत्रू देश तयार झाला आहे. या देशाने आता मूल जन्माला घालण्यासाठी तब्बल ६ लाख देण्याची घोषणा केली आहे. हा देश आहे तैवान. चीनचा शत्रू देश अशी याची ओळख आहे. जन्मदरात सातत्याने घट होत असल्याने तैवान सरकारने अनुदान वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत तैवानमध्ये मुलाला जन्म देण्यासाठी तब्बल ६ लाख रुपये (६७०० डॉलर्स) दिले जातील. तैवान सरकारने याची घोषणा केली आहे. लवकरच मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर ते लागू करण्याची तयारी सुरू झाली आहे.

तैवानच्या स्थानिक माध्यमांनुसार, सरकारने आयव्हीएफच्या मदतीने मुले जन्माला घालणाऱ्या लोकांसाठी हे अनुदान आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, तैवान सरकार मूल जन्माला घालण्यासाठी ३३३० डॉलर्स देत असे, जे आता ६७०० डॉलर्सपर्यंत वाढवण्याची योजना आहे.

तैवानमध्ये वाढत्या महागाईमुळे आणि घटत्या जन्मदरामुळे सरकार चिंतेत आहे. त्यामुळेच आता तैवानच्या आरोग्य आणि कल्याण मंत्रालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार, प्रजनन उपचारांसाठी दुसऱ्या ते सहाव्या चक्रापर्यंतची सबसिडी वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता तैवानमध्ये मूल जन्माला घालण्यासाठी किमान ६७०० डॉलर्स (अंदाजे ५.५ लाख रुपये) दिले जाणार आहेत.

चीनपेक्षा ५ पट जास्त मदत!चीननेही लोकसंख्या वाढवण्यासाठी नुकताच एक निर्णय घेतला होता. त्यानुसार सरकारने प्रत्येक चिनी जोडप्याला मूल जन्माला घालण्यासाठी १.३० लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. पण तैवानची ही नवीन योजना चीनच्या मदतीपेक्षा तब्बल ५ पट जास्त आहे. चीनला भीती आहे की, २०५० पर्यंत देशात तरुणांची संख्या कमी होईल. त्यामुळे अनेक वर्षांपासून चालत आलेला 'एकच मूल' हा नियम चीनने आता मागे घेतला आहे.

तैवानमधील घटता जन्मदर२०२४मध्ये तैवानमध्ये केवळ १.३५ लाख मुलांचा जन्म झाला, जो एक नवा विक्रम आहे. गेल्या ९ वर्षांपासून तैवानमध्ये जन्मदर सातत्याने घटत आहे. वर्ल्डमीटरनुसार, तैवानची एकूण लोकसंख्या २.३० कोटी आहे, त्यापैकी २०% लोक ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. तैवानचा प्रजनन दर ०.८५ आहे, जो चीनपेक्षाही कमी आहे. त्यामुळेच तैवानला आपली लोकसंख्या वाढवण्याची चिंता सतावत आहे.

तैवान आणि चीन यांच्यातील संघर्षतैवान स्वतःला एक स्वतंत्र देश मानतो, तर चीन त्याला आपला भाग मानतो. या दोन देशांमध्ये सतत तणाव असतो. नुकत्याच समोर आलेल्या अमेरिकेच्या एका गुप्तचर अहवालात असं म्हटलं आहे की, चीन २०२७पर्यंत तैवानवर कब्जा करण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे तैवान चीनशी लढण्यासाठी अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी करत आहे.

टॅग्स :chinaचीन