शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

फूड डिलिव्हरी करण्यासाठी मुलीचा 30000 किमी प्रवास, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 12:48 IST

जगातील सर्वात लांब अंतरावरील फूड डिलिव्हरी म्हणून याकडे पाहिले जात आहे.

सध्या डिजिटल काळ सुरू झाले आहे. या काळात ऑनलाइन खाद्यपदार्थ ऑर्डर करण्याचा ट्रेंड सुद्धा वाढला आहे. कंपन्या काही मिनिटांत तुमच्या पत्त्यावर इच्छित खाद्यपदार्थ पोहोचवतात. पण, एका मुलीने खाद्यपदार्थ पोहोचवण्यासाठी 30,000 किलोमीटरचे अंतर कापले. हे करून तिने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. 

चेन्नईची रहिवासी असलेल्या मानसा गोपाल (Maanasa Gopal) हिने अंटार्क्टिकामध्ये फूड डिलिव्हरी करण्यासाठी केलेल्या प्रवासाचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.फूड डिलिव्हरीसाठी  4 महाद्वीप पार करून सिंगापूरहून अंटार्क्टिकाला पोहोचली होती, असे व्हिडीओमध्ये मानसा गोपालने सांगितले आहे. 

जगातील सर्वात लांब अंतरावरील फूड डिलिव्हरी म्हणून याकडे पाहिले जात आहे. तिने फूड पॅकेट्स घेऊन 30,000 किलोमीटरचा प्रवास कसा केला, हे व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. तिचा प्रवास सिंगापूरपासून सुरू झाला. यानंतर ती हॅम्बर्ग (जर्मनी) येथे पोहोचली. त्यानंतर ब्युनोस (अर्जेंटिना) मार्गे मानसा अंटार्क्टिकाला पोहोचली आणि ग्राहकांपर्यंत फूड पोहोचवले.

या व्हिडीओमध्ये मानसा अनेक बर्फाळ आणि चिखलमय रस्ते पार करताना दिसून येत आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, "मी सिंगापूर ते अंटार्क्टिकाला खास फूड डिलिव्हरी केली. हा अप्रतिम प्रवास लोकांसोबत शेअर करायला खूप उत्सुक आहे." दुसर्‍या पोस्टमध्ये, मानसाने सांगितले की, "2021 पासून मी अंटार्क्टिक मोहिमेसाठी पैसे गोळा करण्याचा प्रयत्न करत होती. गेल्या महिन्यात फूड पांडा (@foodpandasg) ने माझी ट्रिप स्पॉन्सर केली."

दरम्यान, मानसा गोपालच्या व्हिडीओवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने विचारले- तुम्ही कोणत्या फूडची डिलिव्हरी केली? दुसर्‍याने लिहिले - अविश्वसनीय. तर आणखी एका युजर्सने म्हटले की, आश्चर्यकारक, इतकी लांब डिलिव्हरी.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेfoodअन्न