शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिसाठी कायपण! मैत्रिणीचा जीव वाजवण्यासाठी तिने मगरीशी केले दोन हात   

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 16:16 IST

मैत्रिसाठी प्रसंगी जीवपण देऊ असं अनेकजण म्हणतात. मात्र प्रत्यक्षात तशी वेळ आली की मैत्रिसाठी प्राण पणाला लावणारे फार थोडे असतात.

मैत्रिसाठी प्रसंगी जीवपण देऊ असं अनेकजण म्हणतात. मात्र प्रत्यक्षात तशी वेळ आली की मैत्रिसाठी प्राण पणाला लावणारे फार थोडे असतात. मात्र आपल्या मैत्रिणीचे प्राण वाचवण्यासाठी  एका ११ वर्षीय मुलीने जे काही केले ते वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.  मैत्रिणींसह तलावात पोहत असताना या मुलीच्या एका मैत्रिणीवर मगरीने हल्ला केला. मात्र या ११ वर्षीय मुलीने मैत्रिणीचा जीव वाचवण्यासाठी चक्क मगरीशी दोन हात केले.ही घटना झिम्बाव्वेमधील सिंड्रेला या गावात घडली आहे. रेबेका मुंकोंब्वे असे या धाडसी मुलीचे नाव आहे. रेबेकाची मैत्रिण लाटोया मुवानी आपल्या काही मैत्रिणींसमवेत गावाजवळ असलेल्या नदीत पोहत होती. त्यावेळी एका मगरीने तिच्यावर हल्ला केला. ही मगर लाटोयाला ओढत नदीत खोलवर घेऊन जाऊ लागली. तेवढ्यात आरडाओरडा ऐकून सावध झालेल्या रेबेका हिने धाडस करून मगरीच्या पाठीवर उडी मारली. मगरीने लाटोयाचा हात आणि पाय पकडून ठेवला होता. दरम्यान, मगरीच्या पाठीवर स्वार झालेल्या रेबेकाने मगरीवर प्रतिहल्ला करण्यास सुरुवात केली. तिने मगरीच्या डोळ्यांवर वार करण्यासा सुरुवात केली. मगरीने लाटोयाला सोडेपर्यंत ती वार करतच राहिली. अखेरीस रेबेकाच्या निर्धारापुढे मगरीची शक्ती कमी पडली आणि ती लाटोयाला सोडून निघून गेली. दरम्यान, या घटनेबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना रेबेकाने सांगितले की, ''आम्ही सर्व मैत्रिणी गावाजवळील नदीत पोहत होतो. तेवढ्याच एका मगरीने लाटोयावर हल्ला केला. या सर्व मुलींमध्ये मीच सर्वांत मोठी होते. त्यामुळे तिला वाचवण्यासाठी मी नदीत उडी घेतली. मगरीने लाटोयाचा हात आणि पाय पकडून ठेवला होता. अखेर मगरीने तिला सोडून दिल्यानंतर मी लाटोयासोबत पोहत किनाऱ्यावर आले. मात्र तोपर्यंत मगरीने आमच्यावर पुन्हा हल्ला केला नाही.''मगरीशी झुंज दिल्यानंतरही रेबेकाला फार दुखापत झाली नाही. मात्र तिची मैत्रीण असलेल्या लाटोयाला किरकोळ जखमा झाल्या आहेत. तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तिच्यावर उपचार सुरू आहेत.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय