शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

विजय मल्ल्याचे जहाज विकून कर्ज चुकते करा- लंडन कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 00:13 IST

विजय मल्ल्याला हा आणखी एक धक्का बसला असून, हे जहाज त्याच्या आवडीचे असल्याचे मानले जाते.

लंडन : भारतातील बँकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून विदेशात पलायन केलेला मद्य व्यावसायिक विजय मल्ल्या याचे आलिशान जहाज विकून बँकेचे कर्ज चुकते करण्याचा आदेश लंडन हायकोर्टाच्या एडमिरल्डी डिव्हिजनमधील सुनावणीत न्या. निग्ले टीज यांनी दिला. दी फोर्स असे या जहाजाचे नाव आहे व विजय मल्ल्याचा मुलगा या जहाजाचा कायदेशीर मालक आहे.

विजय मल्ल्याला हा आणखी एक धक्का बसला असून, हे जहाज त्याच्या आवडीचे असल्याचे मानले जाते. हे जहाज विकून मिळणाऱ्या रकमेतून कतार नॅशनल बँकेचे ६० लाख युरोचे कर्ज चुकते करण्यात यावे, असे कोर्टाने सोमवारच्या आदेशात म्हटले आहे. कर्जासाठी दिलेल्या हमीमध्ये मल्ल्याद्वारे दिलेली व्यक्तिगत हमीही समाविष्ट आहे.

जहाज मल्ल्याच्या मुलाचे असले तरी आपला उद्देश कर्जाची वसुली करणे हा आहे, असे बँकेने सुनावणीदरम्यान कोर्टासमोर सांगितले. कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, जहाजाचा मालक या प्रकरणात प्रतिवादी आहे. तो सुनावणीच्या काळात न्यायालयात हजर राहिला नाही. (वृत्तसंस्था)लवकरच जहाजाचे मूल्यांकनकतार नॅशनल बँकेकडून घेतलेल्या या कर्जाचा हमीदार विजय मल्ल्या आहे. नियमानुसार, हे कर्ज २०१५ पर्यंत परत केले जाणे अपेक्षित होते; परंतु तसे झाले नाही. त्यानंतर जानेवारी २०१८ मध्ये जहाज जप्त करण्यात आले. हे जहाज सध्या साऊथ हॅम्पटन बंदरावर निगराणीत उभे आहे. कोर्टाने नियुक्त केलेले अ‍ॅडमिरल मार्शल पॉल फॉरेन कर्जवसुलीसाठी जहाजाचे मूल्यांकन करतील व त्यानंतर विक्रीची प्रक्रिया सुरू होईल.

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्या