शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

युक्रेनच्या युद्धकाळात जर्मनीची रशियाकडून सर्वाधिक इंधन खरेदी; भारताबाबत दुटप्पी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 07:29 IST

सीआरईसीएच्या अभ्यासातील निष्कर्ष, २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनचे युद्ध सुरू झाले. तेव्हापासून दोन महिन्यांत जर्मनीने रशियाकडून सर्वाधिक तेल व नैसर्गिक वायू खरेदी केला आहे.

बर्लिन : युक्रेनचे युद्ध सुरू झाल्यानंतरच्या दोन महिन्यांत जर्मनीने रशियाकडून सर्वाधिक इंधन तेल व नैसर्गिक वायूची खरेदी केली आहे. हा व्यवहार ५ हजार अब्ज रुपयांचा आहे. यासंदर्भात सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (सीआरइसीए) या संस्थेने केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला. युक्रेन युद्धात त्या देशाला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणारा जर्मनी आपले स्वहित जपण्याकरिता रशियाशी थेट वैर घेण्यास तयार नाही. 

२४ फेब्रुवारी रोजी युक्रेनचे युद्ध सुरू झाले. तेव्हापासून दोन महिन्यांत जर्मनीने रशियाकडून सर्वाधिक तेल व नैसर्गिक वायू खरेदी केला आहे. रशियाहून इंधन तेल घेऊन जर्मनीला रवाना झालेली जहाजे तसेच नैसर्गिक वायूचा पाइपलाइनद्वारे होणारा पुरवठा यांचा एकत्र हिशोब सीआरईसीए या संस्थेच्या अहवालात मांडण्यात आला आहे. जर्मनीने गेल्या वर्षी ८ हजार अब्ज रुपयांची इंधन व नैसर्गिक वायू, कोळशाची खरेदी केली. त्या रकमेतील एक चतुर्थांश भाग रशियाला देण्यात आला. उर्जास्रोतांच्या बाबत रशियावर इतके अवलंबून राहिल्यामुळे एक दिवस जर्मनी व युुरोपची सुरक्षा संकटात येऊ शकेल, असा इशारा अनेक देशांनी याआधीच दिला होता. 

भारताबाबत दुटप्पी भूमिकायुरोप एकाच वेळेस रशियाकडून जेवढे तेल खरेदी करतो, तेवढे तेल भारत त्या देशाकडून महिनाभरात खरेदी करतो, असे केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले होते. युक्रेन युद्धाच्या काळातही रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर काही देशांनी टीका केली होती. मात्र, आता जर्मनीच्या दुटप्पी भूमिकेवर कितीजण ताशेरे ओढतात, याकडे भारतासह अनेक देशांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Germanyजर्मनीRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारत