शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

जर्मनीने उभारली जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे यंत्रणा, पर्यावरण रक्षणासाठी उचलले मोठे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 06:25 IST

Hydrogen Rail System: पर्यावरण रक्षणासाठी हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेचे जाळे (नेटवर्क) उभारणारा जर्मनी हा जगातील पहिला देश ठरला आहे. या देशातील लोअर सॅस्कोनी राज्यामध्ये ही रेल्वे यंत्रणा कार्यान्वित झाली.

बर्लिन : पर्यावरण रक्षणासाठी हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेचे जाळे (नेटवर्क) उभारणारा जर्मनी हा जगातील पहिला देश ठरला आहे. या देशातील लोअर सॅस्कोनी राज्यामध्ये ही रेल्वे यंत्रणा कार्यान्वित झाली असून, त्याची चार वर्षांपूर्वीपासून पूर्वतयारी सुरू होती. प्रदूषणरहित रेल्वे यंत्रणा उभारण्याच्या दिशेने जर्मनीने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे.फ्रान्सची कंपनी अल्सटमने हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेन बनविल्या असून, त्या जर्मनीत चालविल्या जातात. सध्या तिथे अशा पाच ट्रेन असून, या वर्षअखेर त्यांची संख्या चौदापर्यंत जाईल. या ट्रेन बनविण्यासाठी जर्मन रेल्वे व अल्सटम कंपनीमध्ये ७४३ कोटी रुपयांचा करार झाला आहे. (वृत्तसंस्था)

ध्वनिप्रदूषणही होणार अतिशय कमी लोअर सॅक्सोनी राज्याचे मंत्री स्टीफन वेईल यांनी सांगितले की, पर्यावरण रक्षणासाठी जर्मनीचा हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेचा प्रकल्प मैलाचा दगड बनणार आहे. या ट्रेनमधून होणारे ध्वनिप्रदूषणही अतिशय कमी आहे.  

कार्बनडाय ऑक्साइड उत्सर्जनात  होणार ४४०० टनांनी घटअल्सटम कंपनीने म्हटले आहे की, हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या रेल्वेमुळे कार्बनडाय ऑक्साइडच्या उत्सर्जनात ४४०० टनांनी घट होणार आहे. या ट्रेनचा कमाल वेग ताशी १४० किमी आहे, तसेच या ट्रेनमुळे दरवर्षी १०.६ लाख लिटर डिझेलची बचत होणार आहे. हायड्रोजन इंधनावरील रेल्वे जाळ्यामुळे जर्मनीच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होणार आहे.

डिझेल ट्रेनची खरेदी करणार नाहीnजर्मन रेल्वेचे प्रवक्ता डिर्क अल्टविग यांनी सांगितले की, आमचा देश भविष्यात डिझेलवर चालणाऱ्या ट्रेन खरेदी करणार नाही. सध्या डिझेलवर चालणाऱ्या ट्रेनचे कालांतराने हरित इंधनावर चालणाऱ्या ट्रेनमध्ये रूपांतर करण्यात येईल. nहरित वायूंच्या उत्सर्जनात २०३० पर्यंत ६५ टक्के कपात करण्याचे उद्दिष्ट जर्मनीने राखले आहे. हरित वायूंच्या उत्सर्जनाच्या १९९० च्या आकडेवारीच्या तुलनेत हे लक्ष्य ठरविण्यात आले आहे. 

 

टॅग्स :railwayरेल्वेGermanyजर्मनी