शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

भारताच्या दोन मित्रांचा इरादा पक्का; शेवटच्या क्षणी चीनला जोरदार धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 14:21 IST

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रस्ताव मांडणाऱ्या चीनला रोखलं; दोनदा आक्षेप घेत भारताच्या मदतीला धावले दोन देश

नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चीनला जोरदार धक्का बसला आहे. पाकिस्तानच्या कराची शेअर बाजारावर सोमवारी दहशतवादी हल्ला झाला. त्या हल्ल्याचा निषेध करत चीन भारताविरोधी मोर्चेबांधणी करण्याच्या प्रयत्नात होता. त्याबद्दलचा प्रस्ताव चीनकडून संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मांडली जाणार होता. मात्र अमेरिकेनं अगदी शेवटच्या क्षणी आक्षेप नोंदवला. त्यामुळे चीनला जोरदार झटका बसला.पाकिस्तानच्या कराची शेअर बाजारावर सोमवारी दहशतवादी हल्ला झाला. त्याबद्दलचा प्रस्ताव चीनकडून मांडण्यात येणार होता. मात्र दोन देशांनी त्याला आक्षेप घेतला. अमेरिकेनं अचानक आक्षेप घेत चीनचा प्रयत्न हाणून पाडला. त्याआधी जर्मनीनं मंगळवारी जर्मनीनं चीनला प्रस्ताव मांडण्यापासून रोखलं. चीन प्रस्ताव मांडण्याच्या तयारीत असताना जर्मनीनं आक्षेप नोंदवला. त्यामुळे चीनला प्रस्ताव सादर करता आला नाही. याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी कराची शेअर बाजारातील हल्ल्यासाठी भारताला जबाबदार धरलं. या हल्ल्यात चार सुरक्षा कर्मचाऱ्यांसह एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. तर चार दहशतवादी मारले गेले. चीननं या हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त करत पाकिस्तानसोबतचे आपले मजबूत संबंध दाखवण्यासाठी एक प्रस्ताव तयार केला होता. चीननं मंगळवारी संध्याकाळी हा प्रस्ताव सादर केला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत न्यूयॉर्कमधील स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ४ वाजेपर्यंत कोणीही आक्षेप न घेतल्यास त्या कराराला मंजुरी मिळते. मंगळवारी संध्याकाळी ४ वाजता जर्मनीनं प्रस्तावाला आक्षेप नोंदवला. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दहशवतवादी हल्ल्यासाठी भारताला जबाबदार धरलं आहे. आम्हाला हे मान्य नाही, असा आक्षेप जर्मनीनं घेतला. त्यानंतर लगेचच चिनी राजदूतांनी जोरदार विरोध केला. या दरम्यान घड्याळाचा काटा ४ च्या पुढे गेला. त्यानंतर प्रस्तावाची डेडलाईन १ जुलै सकाळी १० पर्यंत करण्यात आली. सुरक्षा परिषदेत दुसऱ्या दिवशी पुन्हा चीनकडून प्रस्ताव मांडण्यात आला. घड्याळाचा काटा १० च्या जवळ जाताच अमेरिकेनं आक्षेप नोंदवला. त्यामुळे चीनला पुन्हा धक्का बसला. आता चीनकडून पुन्हा हा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. मात्र चीन आणि पाकिस्तानला दोन देशांनी धक्का दिला आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही देश भारतासाठी धावून आले आहेत. 

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघAmericaअमेरिकाchinaचीनGermanyजर्मनीPakistanपाकिस्तान