शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! केवळ ८७ रूपयात विकला १३५ खोल्यांचा महाल, राजकुमार वडिलांनी मुलावर केली केस....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 13:10 IST

जर्मनमधील हनोवर शहरातील राजकुमार अर्नस्ट ऑगस्ट ने आपला १३५ खोल्यांचा मॅरीनबर्ग महाल २००० साली आपला मुलगा अर्नस्ट ऑगस्ट ज्यूनिअरला सोपवला होता.

बर्लिनमध्ये राजकुमाराच्या मुलाने १३५ खोल्यांचा महाल केवळ ८७ रूपयांना विकला आहे. हे वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसला. काहींना हे खोटंही वाटेल. पण हे खरं आहे. आता हा महाल वाचवण्यासाठी ६६ वर्षीय राजकुमाराने आपल्या ३७ वर्षीय मुला विरोधात कोर्टात गेला आहे. 

जर्मनमधील हनोवर शहरातील राजकुमार अर्नस्ट ऑगस्ट ने आपला १३५ खोल्यांचा मॅरीनबर्ग महाल २००० साली आपला मुलगा अर्नस्ट ऑगस्ट ज्यूनिअरला सोपवला होता. त्यांचा मुलगा ऑगस्ट ज्यूनिअरने २०१८ साली फारच कमी किंमतीत मॅरीनबर्ग महाल सरकारला विकण्याची घोषणा केली.

यानंतर अर्नस्ट ऑगस्ट ज्यूनिअरने महाल केवळ एक यूरो (८७ रूपये) मध्ये विकला. त्याने यामागे तर्क दिला की, महालाच्या बांधकामासाठी २३ मिलियन पाउंडची गरज होती. जे त्याच्याकडे नाहीत. मुलाच्या या निर्णयानंतर आता महाल वाचवण्यासाठी अर्नस्ट ऑगस्ट कायद्याचा आधार  घेत आहेत आणि त्यांनी मुलाविरोधात केस केली आहे. त्यांनी आपल्या मुलावर गंभीर आरोप लावले आहेत आणि सोबतच महाल परत मागितला आहे.

मॅरीनबर्ग या महालाचं निर्माण १८६७ मध्ये करण्यात आलं होतं आणि राजकुमार अर्नस्ट ऑगस्ट यांनी हा महाल २००० साली आपल्या मुलाकडे सोपवला होता. राजकुमार ऑगस्ट यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाने त्यांच्यासोबत दगा केलाय. मला न सांगता त्याने हा व्यवहार केला. त्यांनी आपल्या मुलावर अधिकार आणि हितांचं उल्लंघन केल्याचा आरोप लावला आहे.

ते म्हणाले की, मुलाच्या या वागण्यामुळे त्यांना ऑस्ट्रियातील एखा लॉजमध्ये रहावं लागत आहे आणि ते आजारी असून सुद्धा त्यांना आर्थिक मदत मिळत नाहीये. राजकुमार अर्नस्ट ऑगस्ट हे नोवर राजवंशातील आहेत. ते ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांचे चुलत भाऊ आहेत. 

टॅग्स :Germanyजर्मनीJara hatkeजरा हटके