शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सायबर हल्ल्यांमुळे जर्मन उद्योगाला तब्बल ५० अब्ज डॉलरचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 02:56 IST

जर्मनीमधील दोन तृतीयांश वस्तू उत्पादक कंपन्यांवर सायबर हल्ले

बर्लिन : जर्मनीमधील दोन तृतीयांश वस्तू उत्पादक (मॅन्युफॅक्चर) कंपन्यांवर सायबर हल्ले झाले असून, त्यामुळे या कंपन्यांना तब्बल ६३ अब्ज युरो म्हणजेच ५० अब्ज डॉलरचा फटका बसला आहे.जर्मनीची आयटी क्षेत्रातील संघटना बिटकॉमने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. युरोपातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीच्या वस्तू उत्पादन क्षेत्रातील ५०३ कंपन्यांचे सर्वोच्च व्यवस्थापक आणि सुरक्षा प्रमुखांची मते या सर्वेक्षणात जाणून घेण्यात आली. अर्थव्यवस्थेचा कणा असलेले छोटे आणि मध्यम उद्योग सायबर हल्ल्यांना सर्वाधिक बळी पडत असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. बिटकॉमचे प्रमुख अचिम बर्ग यांनी सांगितले की, जागतिक बाजारात नेतृत्वस्थानी असल्यामुळे जर्मन उद्योगांत सायबर गुन्हेगारांना विशेष रस आहे. सायबर सुरक्षा आणि गुंतवणूक, अशा दोन्हींकडे अधिक लक्ष द्यायला हवे.सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे की, जर्मन सुरक्षा अधिकारी दीर्घकाळापासून सायबर हल्ल्याच्या धोक्याबाबत सावध करीत आहेत. जर्मनीला जगात निर्यातदार देश बनविणाऱ्या वस्तू उत्पादन क्षेत्रातील तंत्रज्ञान चोरण्यासाठी विदेशी गुप्तहेर संस्था या हल्ल्यांमागे आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमGermanyजर्मनी