शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

George W Bush: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांची जीभ घसरली, इराकवर अमेरिकन हल्ल्याची केली निंदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 17:40 IST

Gorge W Bush: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनीच 2003 मध्ये इराकवर आक्रमण करण्याचे आदेश दिले होते.

वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. एका कार्यक्रमात बोलताना बुश यांनी रशियन हल्ल्याचा निषेध करताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे हुकूमशहा असे वर्णन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची तुलना ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्याशी केली. मात्र या कार्यक्रमादरम्यान त्यांची जीभ घसरली आणि चुकून त्यांनी युक्रेनऐवजी इराकचे नाव घेत इराकवरील हल्ल्याचा निषेध केला.

युक्रेनच्या अध्यक्षांचे कौतुकबुश यांनी सदर्न मेथोडिस्ट युनिव्हर्सिटीच्या एका कार्यक्रमादरम्यान बोलताना म्हटले की, "देशात ज्याप्रकारे निवडणुका होतात, त्यावरुन देशातील नेते आपल्या लोकांशी आणि इतर देशांशी कसे वागतात, हे कळतं. युक्रेनकडे पाहून हे समजू शकता.'' यावेळी बुश यांनी व्होलोडिमिर झेलेन्स्की यांना "कूल लिटल मॅन" आणि "21 व्या शतकातील चर्चिल" म्हणून संबोधले. ते पुढे म्हणाले की, "झेलेन्स्कींना बहुसंख्य लोकांनी निवडले आहे, त्यांना रशियन आक्रमणाविरूद्ध आपल्या देशाचे रक्षण करण्याचे अधिकार मिळाले आहेत."

युक्रेनऐवजी इराकचा उच्चारआपल्या 10 मिनिटांच्या भाषणादरम्यान बुश यांनी पुतीन यांच्यावर टीका केली. पुतिन यांनी रशियामधील जनतेच्या आक्रोशाला निर्दयपणे दडपले, राजकीय विरोधकांना तुरुंगात टाकले. रशियामध्ये कोणताही चेक अँड बॅलन्स राहिलेला नाही.' यादरम्यान बोलताना बुश यांची जीभ घसरली आणि ते म्हणाले, ''एका व्यक्तीने इराकवर आक्रमण करण्याचा हा पूर्णपणे अन्यायकारक आणि क्रूर निर्णय आहे." लगेच त्यांना आपली चुक कळाली आणि "युक्रेनवर आक्रमण करण्याचा" असं म्हणाले.

प्रेक्षकांमध्ये हशात्यांचे वाक्य ऐकून प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर बुश दबक्या आवाजात म्हणाले, 'इराकही.' बुश यांनी त्यांच्या घसरलेल्या जीभेला त्यांच्या वयाचा दोष म्हटले. विशेष म्हणजे, बुश यांनीच 2003 मध्ये इराकवर आक्रमण करण्याचे आदेश दिले होते. टीकाकार याला क्रूर आणि अन्यायकारक हल्ला म्हणतात. इराक युद्धात चार हजारांहून अधिक अमेरिकन सैनिक आणि 10 हजारांहून अधिक इराकी नागरिकही मारले गेले होते.

टॅग्स :AmericaअमेरिकाrussiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया