शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

गाझामध्ये नरसंहार; शहर बेचिराख! २३ लाख लोकांची शहराबाहेर पडण्यासाठी धडपड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 12:56 IST

हमासने केलेल्या रक्तपाताचा बदला घेण्याची इस्रायलने शपथ घेतली असून, त्यासाठी शक्य ते सर्व पर्याय इस्रायल अजमावत आहे.

जेरुसलेम : हमास दहशतवाद्यांचे प्रमुख केंद्र असलेल्या गाझाला इस्रायलने चारही बाजूंनी घेरले असून, २३ लाख लोक शहराबाहेर पडण्यासाठी धडपड करत आहेत. गाझा शहराभोवती इस्रायलचे जवळपास ४ लाख सैन्य तैनात असून, ते गाझामध्ये जमिनीवरून हल्ला करण्याची तयारी करत असल्याचे इस्रायलच्या लष्करी प्रवक्त्याने म्हटले आहे. हमासने केलेल्या रक्तपाताचा बदला घेण्याची इस्रायलने शपथ घेतली असून, त्यासाठी शक्य ते सर्व पर्याय इस्रायल अजमावत आहे.

संपूर्ण नाकेबंदीमुळे गाझा शहरातील ऊर्जा प्रकल्प बंद पडले असून, वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे गंभीर जखमी रुग्णांवर उपचार करणेही कठीण झाले आहे. विजेअभावी शेकडो मुलांचे जीव धोक्यात आले आहेत.

अन्न, पाणी, इंधन आणि औषधांचा पुरवठा बंद केल्याने जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्राणघातक हल्ल्यामुळे पॅलेस्टिनी नागरिकांनी शहराबाहेर पडण्याची धडपड सुरू केली आहे. हवाई हल्ल्यांमुळे शहर बेचिराख झाले असून, ढिगाऱ्याखाली  सैनिक, पुरुष, स्त्रिया, मुले आणि अज्ञात वृद्धांचे मृतदेह उरले आहेत. दरम्यान, आधुनिक अमेरिकन शस्त्रांची पहिली खेप इस्रायलमध्ये दाखल झाल्यामुळे या युद्धाची भीषणता दिवसेंदिवस वाढत आहे.

इस्रायलने हमास या दहशतवादी गटाने केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे दिवसरात्र दहशतवाद्यांना हेरून त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. अनेक ठिकाणी इस्रायल पॅलेस्टाईनवर हाडे वितळवणारा व्हाइट फॉस्फरस बॉम्ब फेकत आहे. त्यामुळे अनेकांचा मृत्यू होत आहे. 

या युद्धात आतापर्यंत जवळपास २२०० मृत्यू झाले आहेत. यात, १००० - पॅलेस्टिनी, १२००-इस्रायल तर १५०० दहशतवाद्यांचा समावेश आहे. 

भारताचे 'ऑपरेशन अजय' - ज्या भारतीयांना मायदेशात परतायचे आहे त्यांना इस्रायलमधून परत आणण्यासाठी भारताने 'ऑपरेशन अजय' सुरू केले आहे. - यासाठी विशेष विमाने पाठविण्यात येणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली. इस्रायलमध्ये १८ हजार भारतीय आहेत.

 

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायलPalestineपॅलेस्टाइन