शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

गाझा पेटले, इस्रायल - पॅलेस्टाइन संघर्ष पुन्हा उफाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 16:25 IST

गाझामध्ये इस्रायल-पॅलेस्टाइन असा संघर्ष पुन्हा एकदा उफाळला आहे. अमरिकेने आपला राजदुतावास तेल अविवमधून जेरुसलेमला आणण्याचा निर्णय घेतल्यानंतर येथे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

गाझा सिटी- सोमवारी इस्रायली फौजांकडून मारल्या गेलेल्या पॅलेस्टीनी नागरिकांच्या मृत्युबद्दल गाझामध्ये आज बंद पाळण्यात आला. 2014नंतर अशी तणावाची स्थिती पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. अमेरिकेने जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून दर्जा देण्याचे निश्चित केल्यापासूनच या परिसरात तणाव वाढीस लागला होता. त्यातच सोमवारी तेल अविवमधून अमेरिकेने आपला राजदुतावास जेरुसलेमला आणण्याचे निश्चित केले होते. त्यामुळे या तणावात अधिकच भर पडली. पॅलेस्टिनी लोकांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी एकत्र निदर्शने सोमवारी केली. सोमवारी इस्रायली फौजांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यामधये 58 पॅलेस्टिनी नागरिकांचे प्राण गेले आहेत तर 2700 नागरिक जखमी झाले आहेत. या मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने या गंभीर परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. कालचा सोमवार पॅलेस्टिनी लोकांसाठी अत्यंत घातक ठरला. इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये 2014 साली झालेल्या लढाईनंतर असा गंभीर प्रसंग पहिल्यांदाच घडला आहे. 58 मृतांमध्ये 6 लहान मुलांचा समावेश आहे आणि अश्रूधुरामुळे एका बाळाचे प्राणही गेले आहेत.इस्रायलकडून प्रत्युत्तरात 2700 लोक जखमी झाले. त्यातील 1360 लोक थेट गोळीबारामुळे जखमी झाले तर 130 लोकांची स्थिती अत्यंत गंभीर आहे. गाझामध्ये आधीच वैद्यकीय सेवा अपुऱ्या आहेत, त्यातच इतक्या मोठ्या संख्येने जखमी रुग्णालयात आल्यामुळे वैद्यकीय सेवेवर प्रचंड ताण आला आहे. जेरुसलेमला इस्रायलच्या राजधानी दर्जा देण्यास इतर देशांनी अद्याप नकार दिला आहे. अमेरिकेत ट्रम्प प्रशासनाने इस्रायलच्या बाजूने निर्णय घेत आपला दुतावास तेल अविववरुन हलविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मध्य-पुर्वेत अशांतता निर्माण झालीच त्याहून अमेरिकेवर सर्व बाजूंनी टीकाही होऊ लागली. इतर देशांनी मात्र आपापले दुतावास तेल अविवमध्येच ठेवले आहेत.

टॅग्स :Israelइस्रायलPalestineपॅलेस्टाइन