शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

युद्धाच्या छायेत गॅसपुरवठा विस्कळीत; दरामध्ये वाढ, कतारने उत्पादन थांबविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 04:50 IST

भारत, युरोपला इंधन तुटवड्याची झळ; भारत मोठा खरेदीदार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :  अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जगातील आघाडीचा गॅस उत्पादक कतारने द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) उत्पादन तात्पुरते थांबविल्याने भारत आणि युरोपमध्ये इंधन तुटवड्याची भीती वाढली आहे. युद्ध सुरू झाल्यापासून युरोपमधील गॅस दर ३० टक्क्यांहून अधिक वाढले आहेत.

उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी रॉयटर्सला सांगितले की, भारतातील प्रमुख आयातदार पेट्रोनेट एलएनजी लि. यांनी गेल (इंडिया) तसेच इतर कंपन्यांना १० ते ३० टक्क्यांपर्यंत पुरवठा कपातीची माहिती दिली आहे. गेल आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांनीही ग्राहकांना गॅसकपातीबाबत कळविले आहे.भारत हा जगातील चौथा सर्वांत मोठा एलएनजी खरेदीदार असून, आयातीसाठी मोठ्या प्रमाणावर मध्यपूर्वेवर अवलंबून आहे. अबूधाबी नॅशनल ऑइल कंपनीचा भारत हा सर्वांत मोठा ग्राहक आहे, तर कतारकडून एलएनजी खरेदीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तुटवडा भरून काढण्यासाठी आयओसी, गेल आणि पेट्रोनेट स्पॉट टेंडर काढण्याची तयारी करीत आहेत; मात्र स्पॉट दर, वाहतूक आणि विमा खर्चात मोठी वाढ झाली आहे.

उत्पादन केले स्थगितकतार एनर्जीने ड्रोन हल्ल्यानंतर सोमवारी उत्पादन स्थगित केले. मेसाईद औद्योगिक शहरातील वीज प्रकल्पावरील पाण्याच्या टाकीवर तसेच रास लाफान येथील ऊर्जा प्रकल्पावर झालेल्या हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. होर्मुझ सामुद्रधुनीतही तणाव वाढल्याने तेल आणि गॅस दरात वाढ झाली आहे. जागतिक एलएनजी बाजारातील सुमारे २० टक्के निर्यात कतारकडून होते. पुरवठा घटल्याने बाजारात तुटवडा निर्माण झाला असून, दर झपाट्याने वाढत आहेत.युरोपमध्ये डच टीटीएफ नैसर्गिक वायू करारात ३३ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदली गेली, तर सोमवारी  दरामध्ये जवळपास ४० टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. संघर्ष दीर्घकाळ चालण्याची शक्यता व्यक्त होत असून, त्याचे ऊर्जा बाजारावर दूरगामी परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Gas Supply Disrupted Amid Conflict; Prices Rise, Qatar Halts Production

Web Summary : Amidst escalating tensions, Qatar, a major gas producer, has temporarily halted LNG production, raising concerns about fuel shortages in India and Europe. Gas prices in Europe have surged. India's importers face supply cuts, prompting a search for alternative sources.
टॅग्स :Iranइराणwarयुद्धQatarकतार