शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

गलवान हिंसा: चीनी सैनिकांच्या मृत्यूबाबत प्रश्न विचाराल तर तुरुंगात जाल!; चीनचा नवा कायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 17:22 IST

गलवान खोऱ्यात (Galwan Valley Clash) भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर बराच काळ चीननं आपल्या सैनिकांच्या मृत्यूबाबतची माहिती दडवून ठेवली होती.

गलवान खोऱ्यात (Galwan Valley Clash) भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर बराच काळ चीननं आपल्या सैनिकांच्या मृत्यूबाबतची माहिती दडवून ठेवली होती. जूनमध्ये झालेल्या या घटनेनंतर तब्बल ८ महिन्यांनी चीननं नुकतंच या हिंसाचारात चीनचे सैनिक मारले गेल्याचं अधिकृतरित्या मान्य केलं. पण आता यात मारले गेलेल्या चीनी सैनिकांबाबत प्रश्न विचारणं हा गुन्हा ठरवणारा एक कायदा चीनमध्ये लागू करण्यात आला आहे. 

१ मार्चपासून चीनमध्ये एक नवा कायदा लागू करण्यात आला आहे. यात सोशल मीडियावर किंवा इंटरनेटवर कुठंही सैनिकांच्या मृत्यूबाबत प्रश्न विचारणाऱ्यांना कमीत कमी तीन वर्षांची शिक्षेची तरतूद केली आहे. चीनच्या म्हणण्यानुसार गलवान खोऱ्यातील संघर्षात चार सैनिक मारले गेले आहेत. पण भारतानं चीनचे अनेक सैनिक ठार झाल्याचा दावा केला आहे. भारतीय लष्करातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या दाव्यानुसार चीनचे २० हून अधिक सैनिक झटापटीत मारले गेले होते. 

एका ब्लॉगरला तुरुंगवासाची शिक्षागेल्याच महिन्यात लिटिल स्पायसी पेन बॉल नावाचा ब्लॉग लिहिणाऱ्या किऊ जिमिंग याला चीनकडून अटक करण्यात आली होती. त्यानं आपल्या ब्लॉगमध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षात चीनी सैनिकांच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. "चीनी सैनिकांचा मृत्यू आपल्या साथीदार सैनिकांचे प्राण वाचवताना झाला असं जर असेल तर असे आणखी काही सैनिक असतील की ज्यांना वाचविण्यात यश आलं नाही. म्हणजेच यात अनेक सैनिक दगावले असू शकतात", असं या ब्लॉगरनं लिहिलं होतं. सोशल मीडियात या ब्लॉगरचे तब्बल २५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. गलवान हिंसेवर प्रश्न उपस्थित केल्याप्रकरणी या ब्लॉगरला आता तीन वर्षांपर्यंतची शिक्षा होण्याची शक्यता आहे. 

आतापर्यंत ६ जणांना शिक्षाचीनी सैनिक शहीद झाल्याच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे किंवा सरकारला सवाल विचारण्याच्या आरोपाखाली आतापर्यंत ६ जणांना अक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षासाठी बलिदान देणाऱ्यांनाही 'क्रांतिकारी' आणि 'शहीदा'चा दर्जा दिला जातो आणि याबाबत सवाल उपस्थित करणाऱ्यांना अटक केली जाते.  

टॅग्स :chinaचीनIndian Armyभारतीय जवान