शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

G7 Summit: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष PM मोदींना भेटणार; हिरोशीमामध्ये होईल चर्चा, युद्धानंतर पहिलीच भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 15:43 IST

G7 Summit: PM नरेंद्र मोदी G-7 क्वाड गटासह काही प्रमुख बहुपक्षीय शिखर परिषदांमध्ये सहभागी होण्यासाठी 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर गेले आहेत.

Narendra Modi G7 Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी G-7 क्वाड गटासह काही प्रमुख बहुपक्षीय शिखर परिषदांमध्ये सहभागी होण्यासाठी आज( शुक्रवारी) जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलियाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत. तीन देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान 40 हून अधिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. द्विपक्षीय बैठकींसह शिखर परिषदांमध्ये दोन डझनहून अधिक जागतिक नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचाही समावेश आहे.

रशिया आणि युक्रेनमधील युद्धानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेणार आहेत. यादरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये युद्धाच्या परिस्थितीवर आणि त्यावर राजकीय तोडगा काढण्यावर चर्चा होऊ शकते. पंतप्रधान मोदी शुक्रवारी हिरोशिमाला पोहोचतील तर झेलेन्स्की शनिवारी G7 मध्ये सहभागी होण्यासाठी हिरोशिमात दाखल होतील.

झेलेन्स्कींचे मोदींना पत्र गेल्या महिन्यात झेलेन्स्कींनी पीएम मोदींना पत्र लिहून मदतीची विनंती केली होती. या पत्रात त्यांनी युक्रेनला अतिरिक्त मानवतावादी मदत पाठवण्याचे आवाहन केले होते. त्याचवेळी युक्रेनचे उप परराष्ट्र मंत्री एमीन जापरोवा हेही तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. दरम्यान, यापूर्वी भारताने अनेक वेळा रशिया आणि युक्रेनमधील तणाव कमी करण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग अवलंबण्याचे आवाहन केले आहे.

इतर अनेक नेत्यांना भेटणारयुक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की व्यतिरिक्त पंतप्रधान मोदी शनिवारी हिरोशिमा येथे जपान, कोरिया, व्हिएतनाम, फ्रान्सच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. याशिवाय रविवारी ते ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. जपानने हिरोशिमा (याच ठिकाणी जगातील पहिला अणुबॉम्ब टाकला गेला होता. ) येथे जी 7 परिषद आयोजित केली आहे. अशा स्थितीत पंतप्रधान फुमियो यांचा हा प्रयत्न अण्वस्त्रविरोधी संदेशाला चालना देणारा असल्याचे बोलले जात आहे.

मोदी 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर पीएम मोदी 6 दिवसांच्या विदेश दौऱ्यावर आहेत. जपाननंतर पंतप्रधान मोदी पापुआ न्यू गिनीला जाणार आणि शेवटी सिडनीला जातील. पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच पापुआ गिनी दौरा असेल. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJapanजपानRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया