शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

G20 Summit : जी-२०चे अध्यक्षपद मिळणे भारतीयांसाठी अभिमानास्पद - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 07:35 IST

G20 Summit : भारत जी-२० गटाचे अध्यक्षपद भारताला मिळणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारत अतिशय कृतिशील व सर्वसमावेशक धोरण स्वीकारणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

बाली : भारत जी-२० गटाचे अध्यक्षपद भारताला मिळणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारत अतिशय कृतिशील व सर्वसमावेशक धोरण स्वीकारणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. जगात वाढलेले भू-राजकीय तणाव, आर्थिक मंदी, अन्नधान्य, ऊर्जा स्त्रोतांच्या गगनाला भिडलेल्या किमती या गोष्टींचे तडाखे बसत असतानाच्या काळात भारताकडे हे अध्यक्षपद आले आहे, याची जाणीव मोदी यांनी आपल्या भाषणात करून दिली.

बाली येथे आयोजित जी-२० गटाच्या दोन दिवसीय परिषदेचा बुधवारी समारोप झाला. त्याआधी झालेल्या समारंभात इंडोनेशियाने भारताला पुढील एक वर्षासाठी या गटाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. रशियाने युक्रेनवर लादलेले युद्ध, जागतिक अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या मुद्द्यांवर या परिषदेत विविध देशांमधील मतभेद उघड झाले होते. 

त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, अध्यक्षपदाच्या काळात भारत नवीन संकल्पना मांडेल, प्रत्यक्ष कृतीवर भर देईल. कोरोनाचा जगावर झालेला परिणाम दूरगामी आहे. त्याशिवाय अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. अशा स्थितीला सामोरे जाताना भारत अतिशय सर्वसमावेशक भूमिका स्वीकारणार आहे. (वृत्तसंस्था)

डिजिटल क्रांतीचे फायदे प्रत्येकाला मिळावेत जी-२० गटाचा नवा अध्यक्ष असलेल्या भारताच्या कार्यकाळाला येत्या १ डिसेंबरपासून प्रारंभ होईल. जी-२० परिषदेतील एका स्वतंत्र सत्रात मोदी म्हणाले की, डिजिटल क्रांतीचे फायदे मानवी समूहाच्या लहानशा हिश्शालाच मिळता कामा नये. प्रत्येकाला डिजिटल क्रांतीचे फायदे मिळावेत, यासाठी येत्या १० वर्षांत प्रयत्न केले पाहिजेत. 

दरवर्षी ३ हजार भारतीयांना नोकरीसाठी ब्रिटनचा व्हिसादरवर्षी भारतातील १८ ते ३० वर्षे वयोगटातील ३ हजार पदवीधर युवकांना ब्रिटनने नोकरीसाठी व्हिसा देण्याचे ठरविले आहे. या व्हिसाची मुदत दोन वर्षे असणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी जी-२० गटाच्या बाली येथील परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेनुसार ही योजना जाहीर करण्यात आली आहे.

नैसर्गिक स्रोतांवरून जगात वादंग : माेदीपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, नैसर्गिक स्रोतांच्या मालकीवरून सध्या जगात वाद सुरू असून, त्यातून होणाऱ्या संघर्षाचे प्रमाण वाढले आहे. ही स्थिती पर्यावरण नुकसानीचे मोठे कारण बनली आहे. त्यामुळे पृथ्वीच्या सुरक्षित भविष्यासाठी योग्य पावले उचलणे आवश्यक आहे.

जी-२०च्या बैठका होणार विविध राज्यांमध्ये विकासासाठी उपयुक्त माहिती’ हे सूत्र स्वीकारून भारत जी-२० गटाच्या अध्यक्षपदाच्या काळात आपले कामकाज करणार आहे. हे अध्यक्षपद मिळणे हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे. जी-२० गटाच्या बैठका भारतातील विविध राज्ये, शहरांमध्ये आयोजिण्यात येतील. भारतामध्ये विविध परंपरा व सांस्कृतिक समृद्धी आहे. त्याचा अनुभव जी-२० देशांना द्यावा, अशी आमची इच्छा आहे.      - नरेंद्र मोदी, पंतप्रधान  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत