शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

G20 Summit : बायडेन यांनी केला पंतप्रधान मोदींना ‘सॅल्यूट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 06:46 IST

G20 Summit : इंडोनेशियामध्ये आयोजिलेल्या जी-२० परिषदेतील विविध देशांच्या प्रमुख नेत्यांनी बाली येथील तिवरांच्या जंगलाला भेट दिली. त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सॅल्यूट केला, तर मोदी यांनी त्यांना अभिवादन केले.

बाली : इंडोनेशियामध्ये आयोजिलेल्या जी-२० परिषदेतील विविध देशांच्या प्रमुख नेत्यांनी बाली येथील तिवरांच्या जंगलाला भेट दिली. त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सॅल्यूट केला, तर मोदी यांनी त्यांना अभिवादन केले. त्याच्या आदल्या दिवशी परिषदेमध्ये आसनावर बसण्याआधी बायडेन मोदींकडे आले व त्यांनी हस्तांदोलन केले होते. जी-२० परिषदेत सहभागी झालेल्या नेत्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. बायडेन यांच्याशी झालेल्या भेटीचा एक व्हिडीओ मोदी यांनी शेअर केला आहे. त्यात बायडेन मोदी यांच्याकडे येत आहेत हे प्रथम त्यांच्या लक्षात आले नाही, असे व्हिडीओत दिसते. मात्र, त्यानंतर मोदी लगेच मागे वळले व त्यांनी बायडेन यांच्याशी हस्तांदोलन केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बायडेन यांना मोदी यांनी अभिवादन करताच बायडेन यांनी त्यांना सॅल्यूट केला. या घडामोडींतून भारत व अमेरिकेमधील घनिष्ठ संबंध दिसून येतात, असे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या तज्ज्ञांचे मत आहे.

मोदींच्या भूमिकेचा जी-२०कडून पुनरुच्चारसध्याचा काळ हा युद्धाचा नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना सप्टेंबर महिन्यात सांगितले होते. मोदी यांच्या या भूमिकेचा पुनरुच्चार करत जी-२० परिषदेने बुधवारी म्हटले आहे की, रशियाने युक्रेनवर लादलेले युद्ध ताबडतोब बंद करावे. मतभेदाच्या मुद्द्यांवर चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढावा. कोणत्याही प्रश्नावर युद्ध करून तोडगा निघू शकत नाही.

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनNarendra Modiनरेंद्र मोदी