शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

Video : कोरोना लस मिळाल्याचा आनंद, भारतीय युवकानं कॅनडात गोठलेल्या तलावावर केला 'भांगडा'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 13:33 IST

हा भांगडा केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर अपलोड झाल्यानंतर, गुरदीप यांच्या या अनोख्या अंदाजाला लोकांची जबरदस्त पसंती मिळत आहे. (Canadian dancer Gurdeep Pandher)

ठळक मुद्देआतापर्यंत कोरोनाने लाखो लोकांचे बळी घेतले आहेत.कॅनडाचा डान्सर गुरदीप पंधेरने 2 मार्चला कोरोना लशीचा पहिला डोस घेतला.लस घेतल्यानंतर तो थेट युकोन येथे गोठलेल्या तलावावर गेला आणि याचा आनंद व्यक्त करण्यासाठी त्याने जबरदस्त भांगडा केला.

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगालाच आपल्या कवेत घेतले आहे. आतापर्यंत कोरोनाने (Corona virous) लाखो लोकांचे बळी घेतले आहेत. यामुळे संपूर्ण जगात आजही कोरोनाची दहशत आहे. मात्र, आता कोरोनाची लस बाजारात आल्याने जगभरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जग भरात कोरोना लसीकरणाचे कार्यक्रम सुरू आहेत. यातच कॅनडाचा डान्सर गुरदीप पंधेरने (Gurdeep Pandher) 2 मार्चला कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. यानंतर त्यांनी आपल्या वेगळ्याच अंदाजात याचा आनंद व्यक्त केला आहे. (Funny video Canadian dancer gurdeep did bhangra in the joy of applying covid vaccine)

गुरदीपचा अनोखा अंदाज :सर्वसाधारणपणे लस घेतल्यानंतर लोक आपल्या घरी जाऊन आराम करतात. मात्र, गुरदीपने असे न करता, लस घेतल्यानंतर बर्फ झालेल्या एका तलावावर भांगडा केला. हा भांगडा केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर अपलोड झाल्यानंतर, गुरदीप यांच्या या अनोख्या अंदाजाला लोकांची जबरदस्त पसंती मिळत आहे. 

जेव्हा पॅन्ट-शर्ट अन् बेल्टवर दिसला हत्ती; आनंद महिंद्रांनी नाव दिलं Ele-Pant, लोक म्हणतायत...

व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल - गुरदीपने स्वतःच ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना सांगितले, की लस घेतल्यानंतर तो थेट युकोन येथे गोठलेल्या तलावावर गेला आणि याचा आनंद व्यक्त करण्यासाठी त्याने जबरदस्त भांगडा केला. त्यांच्या या पोस्टमध्ये 55 सेकंदांचा एक व्हिडिओदेखील आहे. या व्हिडिओमध्ये तो गोठलेल्या तलावावर जबरदस्त भांगडा करताना दिसत आहे. तर या पोस्टच्या कॅप्शनमध्ये गुरदीपने लिहिले आहे, की काल सायंकाळी मला कोविड-19 लशीचा पहिला डोस मिळाला. यानंतर मी माझा आनंद व्यक्त करण्यासाठी गोठलेल्या तलावावर गेलो आणि तेथे भांगडा केला.

खूशखबर! भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन 81 टक्के परिणामकारक; सीरमच्या लसीला टाकले मागे

गुरदीप यांचा हा व्हिडिओ ट्विटरवर 26 लाख हून अधिक वेळा बघितला गेला आहे. एवढेच नाही, तर सोशल मिडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअरदेखील केला जात आहे. एवढेच नाही, तर लोक त्यांच्या भांगड्याची जबरदस्त तारीफ करतानाही दिसत आहेत.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCanadaकॅनडाsikhशीखdanceनृत्य