शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 05:31 IST

इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने अंतिम मंजुरी दिल्यानंतरच हा निर्णय लागू होईल. ९६ मैल लांबीचा हा मार्ग एके ठिकाणी २१ मैल रुंद आहे.

नवी दिल्ली/तेहरान : अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इराणने तेलपुरवठा करणाऱ्या जहाजांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली अरुंद होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामुळे निम्म्या जगावर इंधन तुटवड्याचे व  दरवाढीचे संकट येऊ शकते. इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने अंतिम मंजुरी दिल्यानंतरच हा निर्णय लागू होईल. ९६ मैल लांबीचा हा मार्ग एके ठिकाणी २१ मैल रुंद आहे. ही होर्मुझची सामुद्रधुनी ओमानचे आखात, अरबी समुद्र यांना जोडते. येथूनच जहाजे पुन्हा हिंदी महासागराकडे वळतात. पर्यायी मार्ग आणि तेलाचा तुटवडा यामुळे कच्च्या इंधनतेलाचे सध्या असलेले ७५ डॉलर प्रति बॅरल हे दर थेट १२० ते १३० डॉलरपर्यंत जाऊ शकतात.

भारताला चिंता नाही

भारताकडे सध्या अनेक आठवडे पुरेल इतका तेल आणि गॅसचा साठा असून विविध मार्गांनी भारत कच्च्या तेलाची आयात करण्यास सक्षम आहे, असे देशाचे पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी रात्री सांगितले.

सिरियात आत्मघाती बॉम्बस्फोट, १३ ठार

दमिश्क : सिरियामधील दमिश्क येथील एका गर्दीने खचाखच भरलेल्या चर्चमध्ये रविवारी आत्मघाती बॉम्बस्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला असून ५३ लोक जखमी झाले. मृतकांत काही लहान मुलांचाही समावेश आहे. घटना घडली त्यावेळी लोक प्रार्थना करीत होते. एका आत्मघाती बॉम्बरने स्वत:ला स्फोटकांनी उडवले. अद्याप कुणीही घटनेची जबाबदारी घेतलेली नाही. 

टॅग्स :IranइराणCrude Oilखनिज तेलIsraelइस्रायल