शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
2
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
3
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
4
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
5
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
6
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
7
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
8
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
9
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
10
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?
11
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
12
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
13
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
14
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
15
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
16
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
17
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
18
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
19
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट

बदनामी ते मृत्यू... अंतर फक्त १००० दिवस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 08:20 IST

किम ही दक्षिण कोरियातील लोकप्रिय अभिनेत्री. २४ वर्षांच्या या अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या सेऊलमधील राहत्या घरात सापडला.

बेताल झालेली समाजमाध्यमं आता माणसांच्या आयुष्याचा निकाल लावू लागली आहेत. त्यांच्या जगण्या-मरण्याचं कारण बनू लागली आहेत.  एका अपघातानंतर दक्षिण कोरियातील किम से रोम हिच्या आयुष्याचा ताबा माध्यमांनी घेतला, तेव्हाच तिला आपलं आता काही खरं नाही, हे समजून चुकलं होतं. काही दिवसांपूर्वी एका बातमीनं तिचं असं वाटणं किती खरं होतं हे सिद्ध केलं.

किम ही दक्षिण कोरियातील लोकप्रिय अभिनेत्री. २४ वर्षांच्या या अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या सेऊलमधील राहत्या घरात सापडला. ही आत्महत्या असल्याची बातमी आहे. लोकप्रियतेच्या शिखरावरून कोसळलेल्या किमला पुन्हा चित्रपटात काम करायचं होतं. पैसे कमवायचे होते, एक कॅफे सुरू करायचा होता, हे सगळं तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना माहिती होतं. ते तिचा करिअरमध्ये पुन्हा परतण्याचा संघर्ष पाहत होते. त्या सर्वांसाठी किमचा मृत्यू हा धक्का होता. बदनामीच्या वावटळीत आपली मैत्रीण तरून जाईल, असा विश्वास त्यांना वाटत होता. पण, माध्यमातील बदनामी, समाजाकडून होणारी चिखलफेक किमला सहन झाली नाही आणि म्हणूनच तिने आत्महत्या केली, असा आरोप किमच्या नातेवाइकांनी केला आहे.

किमने खूप लहान वयात चित्रपटात काम करायला सुरुवात केली.  २००९ मध्ये बालकलाकार म्हणून कोरियन चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलेल्या किमला  २०१० मध्ये ‘द मॅन फ्राम नो व्हेअर’ या चित्रपटातील भूमिकेसाठी दक्षिण कोरियन फिल्म इंडस्ट्रीचा ‘बेस्ट न्यू ॲक्ट्रेस’ हा पुरस्कार मिळाला होता. मे २०२२ पर्यंत चित्रपटात वैविध्यपूर्ण भूमिका करून किम लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. पण १८ मे २०२२ मध्ये दारू पिऊन गाडी चालवताना तिच्याकडून अपघात झाला. तिची गाडी एका ट्रान्स्फाॅरर्मरवर धडकली. आजूबाजूच्या ६० दुकानांची वीज गेली. या अपघातानंतर तिने इन्स्टावर सलग अनेक पोस्ट लिहून माफी मागितली. न्यायालयाने तिला २०० मिलियन वोनचा म्हणजे १,३९,००० डाॅलर्सचा दंड ठोठावला. तोही तिने भरला. हा अपघात झाला, तेव्हा आपल्याला न्यायालय काय शिक्षा देईल, यापेक्षा माध्यमं आता आपलं काय करतील, याचीच चिंता जास्त होती. या अपघाताने माध्यमांनी तिचं वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर आणलं.  अनेक यूट्यूब चॅनल्सवर तिच्या वैयक्तिक आयुष्याचे अक्षरश: धिंडवडे काढले गेले.  

दक्षिण कोरियात विशेषत: महिला अभिनेत्रींकडून काही गुन्हा घडला, त्यात त्या दोषी ठरल्या, तर त्यांना पुन्हा चित्रपटात काम मिळणं अवघड होतं. माध्यमातून त्यांची जी बदनामी होते, त्यामुळे त्या हतबल होतात, आपलं मानसिक स्वास्थ्य गमावून बसतात.  अपघातानंतर किमच्या मृत्यूपर्यंत १००० दिवसांत माध्यमांनी अपघात आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यावर २००० पेक्षा जास्त बातम्या प्रसिद्ध केल्या.  त्यातल्या अनेक तथ्यहीन होत्या. तिला चित्रपटात काम मिळत नाहीये. पैसे मिळवण्यासाठी ती एका कॅफेमध्ये काम करतेय, झालेल्या प्रकाराबद्दल तिला जराही पस्तावा नसून, ती निर्लज्जपणे मित्र-मैत्रिणींसोबत पार्ट्या करत आहे, अशा एक ना अनेक बातम्या छापल्या गेल्या.या सनसनाटी पत्रकारितेच्या विरोधातली चर्चा आता त्या देशात सुरू झाली आहे.

टॅग्स :South Koreaदक्षिण कोरिया