शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

"बेडकाचं विष..."; 'नवलनी' यांच्या मृत्यूवर जर्मनी-फ्रान्स-UK भडकले; रशियन सरकारवर गंभीर आरोप, केला मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 21:56 IST

युके, फ्रान्स आणि जर्मनीसह पाच युरोपीय देशांनी नवलनी यांच्या मृत्यूप्रकरणी रशियन सरकारला जबाबदार धरले असून, विष देऊन त्यांची हत्या केल्याचा गंभीर आरोप पुतिन सरकारवर केला आहे...

रशियाचे विरोधी पक्षनेते ॲलेक्सी नवलनी यांच्या मृत्यूवरून आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. युके, फ्रान्स आणि जर्मनीसह पाच युरोपीय देशांनी नवलनी यांच्या मृत्यूप्रकरणी रशियन सरकारला जबाबदार धरले असून, विष देऊन त्यांची हत्या केल्याचा गंभीर आरोप पुतिन सरकारवर केला आहे. 

धक्कादायक म्हणजे, या देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांनी नवलनी यांच्या शरीरात 'एपिबेटिडाइन' (Epibatidine) हे घातक विष आढळल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे, हे विष दक्षिण अमेरिकेतील विषारी बेडकांमध्ये आढळते. जे नैसर्गिकदृष्ट्या रशियात आढळत नाही. 

'ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स'कडे (OPCW) तक्रार करणार -युनायटेड किंगडमच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हणण्यात आले आहे की, "रशियन सरकारने नवलनी यांच्या वाढत्या प्रभावाच्या भीतीपोटी, त्यांना लक्ष्य करण्यासाठी या प्राणघातक टॉक्सिनचा वापर करण्यात आला." संबंधित युरोपीय देशांनी एक संयुक्त निवेदन जारी करत, "रशियाकडे हे विष देण्याची पद्धत, हेतू आणि संधी तिन्ही गोष्टी उपलब्ध होत्या आणि आपण, रासायनिक शस्त्र कराराच्या उल्लंघनासंदर्भात रशियाविरुद्ध 'ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स'कडे (OPCW) तक्रार करत आहोत", असे म्हटले आहे.

"माझ्या पतीची हत्या, आता विज्ञानानं सिद्ध केली..." -यासंदर्भात शनिवारी म्युनिक सुरक्षा परिषदेत बोलताना, युलिया नवलनाया यांनी अत्यंत भावूक होत, अतिशय आक्रमकपणे आपले म्हणणे मांडले. त्या म्हणाल्या, "दोन वर्षांपूर्वी मी याच मंचावरून व्लादिमीर पुतिन यांनी माझ्या पतीची हत्या केल्याचा आरोप केला होता. तेव्हा ते केवळ शब्द होते. मात्र आज ते विज्ञानाने सिद्ध केले आहे. २०२४ मध्ये आर्क्टिक जेलमध्ये झालेली ती हत्या आता वैज्ञानिक पुराव्यांसह जगासमोर आली आहे."

English
हिंदी सारांश
Web Title : Navalny's death: Europe blames Russia, alleges poisoning with rare toxin.

Web Summary : European nations accuse Russia of poisoning Alexei Navalny with Epibatidine, a rare toxin found in South American frogs. They plan to file a complaint with the OPCW, alleging violation of chemical weapons conventions. Navalny's widow asserts scientific proof of Putin's involvement in his murder.
टॅग्स :russiaरशियाUnited Kingdomयुनायटेड किंग्डमFranceफ्रान्सGermanyजर्मनी