शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

फ्रान्समध्ये भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2016 04:23 IST

फ्रान्समध्ये आयोजित युरो कप फुटबॉल स्पर्धेसाठी चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे

पॅरिस : फ्रान्समध्ये आयोजित युरो कप फुटबॉल स्पर्धेसाठी चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे, तरी यजमान देशाला दहशतवादी हल्ल्याची भीती सतावत आहे.१० जून ते १० जुलै या कालावधीत होणाऱ्या युरो कप स्पर्धेच्या निमित्ताने लाखो पर्यटक आणि जगभरातील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी राहणार आहे. अशा स्थितीत फ्रान्सवर स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्याव्यतिरिक्त पर्यटक आणि मीडियाच्या सुरक्षेची जबाबदारी राहणार आहे. फ्रान्सच्या दहशतवादविरोधी शाखेचे एक अधिकारी म्हणाले,‘तयारीचा विचार करता आम्ही आमच्या पातळीवर योग्य खबरदारी घेतली आहे. पोलीस, अर्धसैनिक दल आणि मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात करण्यात आलेले आहेत. पण, प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मला चिंता भेडसावत आहे. यापूर्वी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी रविवारी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती.’ राष्ट्रपतींनी फ्रान्स रेडिओवर म्हटले की,‘सुरक्षेच्या मुद्यावर अखेरच्या क्षणापर्यंत आम्हाला भीती सतावत राहणार आहे, असे दुर्भाग्याने म्हणावे लागते. त्यामुळे युरो कपचे आयोजन यशस्वी करण्यासाठी आपल्याला आवश्यक ते पाऊल उचलावे लागणार आहे. फ्रान्सपुढे सर्वांत मोठे आव्हान सीरिया आणि इराक येथून येणाऱ्या लोकांवर नजर ठेवण्याचे आहे. हे लोक खोट्या पासपोर्टच्या आधारावर युरोपमध्ये दाखल होतात आणि दहशतवादी कारवाया करतात.’अधिकारी पुढे म्हणाला,‘बाहेरून येणाऱ्या व्यक्तींपेक्षा यापूर्वी युरोपात दाखल झालेल्या व्यक्तींपासून आम्हाला अधिक धोका आहे. आम्ही काही सीमेवर नव्याने चौकशी करण्यास प्रारंभ केला आहे, पण केवळ सीमा बंद करून त्यांना रोखणे शक्य होईल, असे वाटत नाही. युक्रेनच्या सुरक्षा व्यवस्थेने सोमवारी फ्रान्सवरील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावल्याचा दावा केला. त्यामुळे फ्रान्सला दहशतवादी हल्ल्याची भीती अधिक सतावत आहे. युक्रेन सुरक्षा व्यवस्था एसबीयूचे प्रमुख व्हेसिली ग्रिटसेक म्हणाले,‘गेल्या महिन्याच्या अखेरीस पोलंडच्या सीमेवर फ्रान्सच्या एका नागरिकला अटक करण्यात आली. त्याच्याकडे रॉकेट लाँचर, क्लाशिनकोव्ह रायफलसह मोठ्या संख्येने हत्यारे मिळाली. चौकशीनंतर कळले की, ही व्यक्ती युक्रेनच्या सशस्त्र समूहांकडून हत्यारे व स्फोटके विकत घेण्याच्या प्रयत्नात होती. त्याच्या निशाण्यावर सरकारी इमारतींव्यतिरिक्त यहुदी व मुस्लिमांची प्रार्थनास्थळे होती. युरो कप स्पर्धेदरम्यान या स्थळांवर हल्ला करण्याची त्याची योजना होती. यापूर्वी गेल्या आठवड्यात अमेरिकेने फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली आहे. अमेरिकेच्या विदेश विभागाने स्पष्ट केले की, उन्हाळ्यामध्ये युरोपात अधिक पर्यटक पर्यटनासाठी येत असल्यामुळे दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे. फ्रान्सच्या यजमानपदाखाली युरो कप स्पर्धेच्या लढती १० स्थळांवर होणार आहेत. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी फ्रान्सने १० स्थळांवर ९० हजार पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या व्यतिरिक्त १० हजार अर्धसैनिक आणि सुरक्षा दलाचे कर्मचारी तैनात राहणार आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये १३० व्यक्तींचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून युरोपमधील सुरक्षा एजन्सी सतर्क झाल्या आहेत. तरी मार्च महिन्यात ब्रसेल्समध्ये आयएसने हल्ला केला होता. त्यात ३२ नागरिकांचा मृत्यू झाला होता. (वृत्तसंस्था)