शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वसुधैव कुटुंबकम...; PM मोदींसोबतचा फोटो शेअर करत मॅक्रॉन यांचा कुणावर निशाणा? समजून घ्या इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 22:27 IST

फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या फोटोचे अनेक धोरणात्मक अर्थ आहेत, असे जागतिक कूटनीतीवर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांचे मत आहे.

पॅरिस : फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन G20 परिषदेत सहभागी झाले होते. याशिवाय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतचा मिठी मारतानाचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोसोबत त्यांनी ‘वसुधैव कुटुंबकम,’ असे लिहिले आहे. याचा अर्थही त्यांनी इंग्रजी आणि फ्रेंचमध्ये लिहिला आहे. मॅक्रॉन यांनी शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पसंत केला जात आहे. यासंदर्भात लोकांमध्ये विविध प्रकारची चर्चाही होत आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या फोटोचे अनेक धोरणात्मक अर्थ आहेत, असे जागतिक कूटनीतीवर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांचे मत आहे.

मॅक्रॉन यांचा निशाणा कुणावर? -जियोपॉलिटिकल एक्सपर्ट व्हेलिना चाकारोव्हा यांनी म्हटले आहे की, गेल्या 14 जुलैला पॅरिसमध्ये झालेल्या पंतप्रधान मोदींच्या भव्य स्वागतानंतर फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी जोरदार संकेत दिले आहेत. “वसुधैव कुटुंबकम” हे स्लोगन प्रामुख्याने चीन आणि रशियासाठी लिहिली गेल्याचे मानले जात आहे. पाश्चिमात्य देशांच्या दृष्टीने चीन आणि रशिया हे जागतिक व्यवस्थेकडे दुर्लक्ष करणारे देश आहेत आणि त्यांच्यामुळे जगावर संकट येऊ शकते. 

फ्रान्स, युक्रेन युद्धासंदर्भात सुरुवातीपासूनच रशियाचा विरोध करत आहे. याशिवाय चीनसंदर्भातही फ्रान्सचे चांगले मत नाही. एवढेच नाही, तर मॅक्रॉन यांनी आगामी ऑलिम्पिकमधून रशियाचा ध्वज काढून टाकण्याचाही आदेश दिला आहे.

मॅक्रॉन यांनी घेली पंतप्रधान मोदींची भेट - G20 शिखर परिषदेनंतर, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. यात, दोन्ही नेत्यांनी इंडो-पॅसिफिक प्रदेशात प्रगत संरक्षण तंत्रज्ञान आणि प्लॅटफॉर्मचे डिझाइन, विकास आणि निर्मितीमध्ये भागीदारीच्या माध्यमाने भारत-फ्रान्स संरक्षण संबंध मजबूत करण्यासंदर्भात वचनबद्धता दर्शवली. तसेच, प्रादेशिक आणि जागतीक समस्यांचा सामना करण्यासाठी भारत-फ्रान्स सहकार्य वाढविण्यासंदर्भातही चर्चा झाली. 

एका संयुक्त निवेदनात म्हणण्यात आले आहे की, डिजिटल, विज्ञान, तांत्रिक नवकल्पना, शिक्षण, संस्कृती, आरोग्य आणि पर्यावरणीय सहकार्य, आदी विषयांवरही या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. 

टॅग्स :G20 Summitजी-२० शिखर परिषदFranceफ्रान्सIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी