शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचं गाझामध्ये युद्धविरामाचं आवाहन, बेंजामिन नेतन्याहूंनी दिलं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 13:58 IST

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्रायलला गाझामध्ये युद्धविराम करण्याचं आवाहन केलं आहे.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्रायलला गाझामध्ये युद्धविराम करण्याचं आवाहन केलं आहे. एका परदेशी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मॅक्रॉन यांनी यावर भाष्य केलं. "इस्रायलनं गाझावर बॉम्ब हल्ले करणं आणि नागरिकांची हत्या करणं बंद केलं पाहिजे," मॅक्रॉन म्हणाले. याशिवाय युद्धबंदीचा इस्रायललाच फायदा होईल असंही त्यांनी नमूद केलं.फ्रान्स हमासच्या 'दहशतवादी' कृत्यांचा स्पष्टपणे निषेध' करतो. परंतु इस्रायलचा 'स्वसंरक्षणाचा अधिकार' ओळखून आम्ही त्यांना गाझामधील बॉम्बहल्ले थांबवण्याची विनंती करतो, असंही मॅक्रॉन म्हणाले. अमेरिका आणि ब्रिटनसह इतर जागतिक नेत्यांनी युद्धविरामाच्या आवाहनात सामील व्हावं अशी त्यांची इच्छा आहे का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर "मला आशा आहे की ते असं करतील," अशी प्रतिक्रिया त्यांनी यावर दिली.... ते योग्य ठरवता येणार नाहीगाझातील सर्व नागरिकांचे हमासशी संबंध नाहीत. निरपराध नागरिकांच्या सुरक्षेसाठी युद्धबंदीशिवाय दुसरा मार्ग नाही. प्रत्यक्षात बॉम्बहल्ल्यात नागरिकांचा बळी जात आहे. या मुलांवर, या महिलांवर, या वृद्धांवर हल्ला करण्याचं कारण नाही आणि त्याचं समर्थनही करता येणार नाही. त्यामुळे आम्ही इस्रायलला हे थांबवण्याची विनंती करतो, असं त्यांनी नमूद केलं.हमासचा निषेध करा - नेतन्याहूइस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. अमेरिका, युरोप आणि मध्य आशियासह जगातील अनेक देशांनी इस्रायलवर गाझामधील कारवाया कमी करण्यासाठी दबाव आणला आहे. पण गाझा स्थित अतिरेकी संघटना हमास पुन्हा एकत्र येण्यासाठी युद्धबंदीचा फायदा घेतील असं त्यांचं म्हणणं आहे. मॅक्रॉन यांच्या वक्तव्यानंतर एका निवेदनाद्वारे इस्रायचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी प्रत्युत्तर दिलं. जागतिक नेत्यांनी इस्रायल नव्हे तर हमासचा निषेध केला पाहिजे. हमास आज गाझामध्ये करत असलेल्या या कारवायांची उद्या पॅरिस, न्यूयॉर्क आणि जगात कुठेही पुनरावृत्ती होऊ शकते, असं ते म्हणाले.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूFranceफ्रान्स