शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

PLAYBOY मासिकावर महिला मंत्र्याचा फोटो; प्रचंड खळबळीनंतर म्हणाल्या... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 12:40 IST

मार्लीन स्किआपा यांनी प्लेबॉय मासिकाच्या एप्रिल अंकासाठी फोटोशूट केले. हा मासिकाचा कव्हर फोटो मासिकाच्या फ्रेंच भाषेतील आवृत्तीसाठी आहे.

फ्रान्समधील सामाजिक अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मार्लीन स्किआपा मोठ्या वादात सापडल्या आहेत. दरम्यान, मार्लीन स्किआपा यांनी 'प्लेबॉय' मासिकाच्या कव्हर पेजसाठी आपले फोटोशूट केले. यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यामुळे मार्लीन स्किआपा यांचे विरोधकच नव्हे तर मित्रपक्षही त्यांच्यावर नाराज झाले आहेत. मार्लीन स्किआपा यांनी प्लेबॉय मासिकाच्या एप्रिल अंकासाठी फोटोशूट केले. हा मासिकाचा कव्हर फोटो मासिकाच्या फ्रेंच भाषेतील आवृत्तीसाठी आहे.

फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनीही मार्लीन स्किआपा यांच्या फोटोशूटच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आणि म्हणाल्या, "त्यांचा निर्णय योग्य नाही. विशेषतः सध्याच्या काळात." दुसरीकडे, ग्रीन पार्टीचे खासदार सँड्रीन रोसो यांनीही सध्याच्या परिस्थितीत फोटोशूट केल्याप्रकरणी मार्लीन स्किआपा यांच्यावर नाराजी व्यक्ती केली आहे. एका टीव्ही चॅनलला त्यांनी सांगितले की, "महिला कुठेही आपले शरीर दाखवू शकतात, मला त्यात काही अडचण नाही, पण एक सामाजिक परिस्थिती असते."

दरम्यान, गेल्या काही आठवड्यांपासून फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत. कामगार संघटना अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या प्रस्तावित पेन्शन सुधारणा योजनेला विरोध करत आहेत, ज्या अंतर्गत निवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, या निषेधाच्या दरम्यान मार्लीन स्किआपा आपल्या फोटोशूटच्या निर्णयाचे समर्थन करत आहेत. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, "महिलांना त्यांच्या शरीरासोबत वाट्टेल ते करण्याच्या अधिकाराचे मी समर्थन करते. सर्वत्र आणि प्रत्येक वेळी. फ्रान्समध्ये महिला मुक्त आहेत. तर यामुळे परंपरावादी आणि भोंदूंचा राग असो वा नसो."

मार्लीन स्किआपा यापूर्वीही सापडल्या होत्या वादात मार्लीन स्किआपा यांनी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्या महिलांच्या हक्कांसाठी लिहित होत्या. त्या अनेकदा टीव्ही शोमध्ये दिसून येत होत्या. 2010 मध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिले. यामध्ये जास्त वजन असलेल्या लोकांना 'सेक्स टिप्स' देण्यात आल्या होत्या. यावर टीकाकारांनी प्रश्न उपस्थित केले होते. तसेच, 2017 मध्ये त्यांच्यावर पॅरिसच्या एका भागात जाण्याचा आरोप होता, जिथे कथितपणे महिलांना मनाई आहे.

टॅग्स :Franceफ्रान्सplayboy magazineप्लेबॉय मॅगेझिन