शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

दक्षिण कोरियात खळबळ! लष्करी कारवाई करा; किम जोंग उनच्या बहिणीचे सैन्याला 'आदेश'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 12:58 IST

यो जोंगने दक्षिण कोरियाला हल्ल्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली असून दक्षिण कोरियाने लष्करी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.

सेऊल : उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन गेल्या 2महिन्यांपासून गायब आहे. त्याच्या मृत्यूच्या बातम्यांमुळे उत्तर कोरियाकडून व्हिडीओ प्रसिद्ध करून जिवंत असल्याचे साऱ्या जगाला भासविण्यात आले आहे. मात्र, सध्या देशाचा कारभार त्याची बहीण आणि उत्तराधिकारी समजली जाणारी किम यो जोंग ही पाहत आहे. तिने आजच दक्षिण कोरियाला सैन्य कारवाईची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. 

यो जोंगने दक्षिण कोरियाला हल्ल्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली असून दक्षिण कोरियाने लष्करी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. यो जोंगने द. कोरियाला शत्रू राष्ट्र म्हटले आहे. तसेच पुन्हा धमकी देत हल्ला करण्याचे वक्तव्य केले आहे. दक्षिण कोरिया लवकरच सीमेवरील बिनकामाच्या संपर्क कार्यालयाच्या बंद होण्याचा साक्षीदार बनणार आहे. आता मी दक्षिण कोरियाविरोधातील कारवाईचे अधिकार सैन्य दलावर सोपवत असल्याचे, जोंग म्हणाली. 

सर्वोच्च नेता, आपला पक्ष आणि देशाकडून देण्यात आलेल्या अधिकार आणि ताकदीचा वापर करून शस्त्रागाराच्या विभाग प्रमुखाला मी असे आदेश देत आहे की, दक्षिण कोरियावर जोरदार कारवाई करण्यात यावी, असे किम यो जोंग हिने म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे यो जोंग ही किम जोंग उनची सर्वात विश्वासू आणि दक्षिण कोरियाशी संबंध ठेवण्याच्या निर्णय प्रक्रियेची प्रमुख आहे. य़ामुळे तिचे या हल्ले करण्याच्या आदेशामुळे दक्षिण कोरियामध्ये खळबळ उडाली आहे.

काय आहे नवा वाद?दोन्ही देशांदरम्यानचे संपर्क कार्यालय कोरोना व्हायरसमुळे गेल्या जानेवारीपासून बंद आहे. 2018 मध्ये जोंग उन आणि द. कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जेऊ यांच्यामधील तीन बैठकांनंतर संपर्क कार्यालये बनविण्यात आली होती. दक्षिण कोरियाने सीमेवर बदनामीकारक व विरोधात पत्रके वाटल्यामुळे उत्तर कोरियाने गेल्याच आठवड्यात मोठा निर्णय घेतला होता. उत्तर कोरियाने या शत्रू देशाशी सैन्य आणि राजनैतिक संबंध तोडून टाकले आहेत. कोरियाच्या केंद्रीय वृत्तवाहिनीनुसार उत्तर कोरियांच्या सीमेवर त्यांच्या विरोधात पत्रके वाटण्यापासून दक्षिण कोरियाने या लोकांना रोखले नाही. यामुळे किम जोंग उनने याची कडक शब्दांत निंदा केली असून दक्षिण कोरियाविरोधात कठोर कारवाई केली आहे. मंगळवारपासून यावर पाऊल उचचले जाणार असून दोन्ही देशांदरम्यानच्या संपर्क कार्यालयातील संचार लाईन आणि राष्ट्रपती कार्यालयातील हॉट लाईन बंद करण्यात येणार आहे. उत्तर कोरियाचे नागरिक द. कोरियाच्या अधिकाऱ्यांच्या विश्वासघातकी वागण्यामुळे खूप नाराज आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या....

 

अधुरी प्रेम कहानी! GF ला भेटण्यासाठी मध्यरात्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला डॉक्टर; जिवाला मुकला

CoronaVirus: देश हादरला! गेल्या २४ तासांत विक्रमी रुग्ण सापडले; अमित शहा कार्यरत

महाविकास आघाडीत धुसफूस; काँग्रेसचे नेते दोन दिवसांत उद्धव ठाकरेंना भेटणार

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन आयसीयूमध्ये; कोरोना टेस्ट निगेटिव्ह

मी राष्ट्राध्यक्षाची निवडणूक हरलो तर...; डोनाल्ड ट्रम्प यांना सतावतेय भीती

आजचे राशीभविष्य - 14 जून 2020; मकर राशीच्या व्यक्तींना प्रिय व्यक्ती भेटेल

 

टॅग्स :South Koreaदक्षिण कोरियाnorth koreaउत्तर कोरियाKim Jong Unकिम जोंग उन