शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
4
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
6
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
7
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
8
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
9
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
10
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
11
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
12
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
13
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
14
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
15
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
16
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
18
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
19
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
20
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी

सिगारेटची ‘मर्दानगी’ फ्रान्स मोडून काढणार! १ जुलैपासून नवा कायदा लागू होणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 10:39 IST

आता सिगारेटचे झुरके घेत धूम्रवलयं सोडत कोणालाही आधुनिक पिढीचे ‘ब्रिगिट बार्डोट’ आणि ‘जीन पॉल बेलमोंडो’ बनता येणार नाही!

ब्रिगिट बार्डोट आणि जीन पॉल बेलमोंडो यांना ओळखता? - फ्रान्समधले जुन्या पिढीतले हे अतिशय प्रसिद्ध कलावंत. तरुण-तरुणी त्यांच्यावर अक्षरश: फिदा होते. ब्रिगिट ही नुसती नामवंत अभिनेत्रीच नव्हती, तर ती गायिका, मॉडल आणि प्राणी हक्क चळवळीतील सक्रिय कार्यकर्तीही होती. फ्रान्समधली चित्रपटसृष्टी तिनं आपल्या अदाकारीनं दणाणून सोडली होती. जवळपास ५० चित्रपटांमध्ये तिनं काम केलं. तिचं आणखी एक विशेष म्हणजे त्या काळातील लैंगिक क्रांतीच्या सर्वांत प्रसिद्ध प्रतीकांपैकी ती एक.

तिच्यासारखाच जीन-पॉल बेलमोंडो. फ्रान्समधला अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता. अभिनय, चित्रपट आणि त्या काळातील नव्या सामाजिक लाटेची पूर्तता त्याच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. फ्रान्सची चित्रपटसृष्टी त्यानं आपल्या अभिनयानं गाजवली होती. अनेक ॲक्शन थ्रिलर चित्रपटांमध्ये पोलिस अधिकारी आणि गुन्हेगारांच्या भूमिका त्यानं अक्षरश: जिवंत केल्या. पण या दोघांची आज इतक्या वर्षांनी पुन्हा आठवण काढण्याचं काय कारण? कारण या दोघांनी आणखी एका बाबतीत समाजावर, तरुणाईवर गारुड केलं होतं. सिगारेटचे झुरके घेत, त्याची वलयं हवेत सोडत, बंडखोर नायक, नायिकांची प्रतिमा रंगवताना त्यांनी स्वत:बरोबरच सिगारेटलाही एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं. सिगारेट आणि तरुणाई, सिगारेट आणि बंडखोरी, सिगारेट आणि सौंदर्य.. असं एक नवं नातंच त्यांच्यामुळे तयार झालं होतं. 

फ्रान्समध्ये सिगारेट ही कधीच फक्त धूम्रपानाचं प्रतीक नव्हती, तिथे आजही सिगारेट म्हणजे मर्दानगी, सेक्स, प्रतिष्ठा, सिनेमॅटिक स्टेटमेंट, प्रेम आणि बंडखोरीचं प्रतीक मानलं जातं. त्यावरच काही पिढ्या तिथे पोसल्या गेल्या, वाढल्या. पण हेच ‘रिल लाइफ’ आता ‘रिअल लाइफ’मध्ये सार्वजनिक ठिकाणी दिसलं तर लोकांना जवळपास १५३ डॉलर्सचा दंड पडणार आहे. सिगारेटचे झुरके घेत धूम्रवलयं सोडत कोणालाही आता आधुनिक पिढीचे ‘ब्रिगिट बार्डोट’ आणि ‘जीन पॉल बेलमोंडो’ बनता येणार नाही!

धूम्रपानाला फ्रान्समध्ये प्रतिष्ठा मिळाल्यामुळे फ्रान्समध्ये आजही तरुणाईत सिगारेट अतिशय लोकप्रिय आहे. पण, त्याचे तोटे समोर आल्यानंतर, आणि युवा पिढी धूम्रपानामुळे बरबाद होत असल्याचं लक्षात आल्यानंतर फ्रान्स सरकारनं धूम्रपानावर निर्बंध आणण्याचं ठरवलं आहे. फ्रान्सच्या आरोग्यमंत्री कॅथरीन वॉट्रीन यांनी म्हटलं आहे. लोकांना सार्वजनिक ठिकाणी, उदाहरणार्थ उद्यानं, बगिचे, समुद्रकिनारे, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, शाळा, महाविद्यालय, बसस्टॉप, जिथे लहान मुलांचा वावर आहे.. इत्यादी ठिकाणी धूम्रपान करता येणार नाही. स्वच्छ हवेत श्वास घेण्याचा मुलांचा अधिकार ज्या ठिकाणी सुरू होईल, त्या प्रत्येक ठिकाणी धूम्रपानाचं स्वातंत्र्य समाप्त होईल!

१ जुलैपासून या संदर्भातला नवा कायदा लागू होईल! जागतिक आरोग्य संघटनेच्या मते फ्रान्समधील तब्बल ३५ टक्के जनता धूम्रपान करते. युरोपात हे प्रमाण २५ टक्के, तर जगात सरासरी २१ टक्के आहे. तंबाखूजन्य पदार्थांमुळे फ्रान्समध्ये दरवर्षी किमान ७५ हजार नागरिक मृत्युमुखी पडतात. तरीही फ्रान्समध्ये तब्बल ६२ टक्के जनतेला म्हणजेच दहापैकी दर सहा जणांना वाटतं, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यात काहीच गैर नाही. तोच समज फ्रान्स सरकारला आता मोडून काढायचा आहे.

टॅग्स :Smokingधूम्रपानFranceफ्रान्सWorld Trendingजगातील घडामोडी