कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका भारताला बसताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात भारतात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून देशात तीन लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली. अशा परिस्थिती देशात आता वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. असा परिस्थितीत फ्रान्सनं आपला मदतीचा हात पुढे केला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राँ यांनी भारताला संकटकाळात मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. भारतातील फ्रान्सचे राजदूत इमॅन्युअल लेनिन यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा संदेश ट्वीट केला आहे. "कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारतातील नागरिकांना मी एकत्र राहण्याचा संदेश देत आहे. संघर्षाच्या या काळात फ्रान्स तुमच्यासोबत उभा आहे. या महासाथीनं कोणालाही सोडलं नाही. आम्ही तुमची मदत करण्यास तयार आहोत," असा इमॅन्युअल मॅक्राँ यांनी दिला आहे. सध्या भारतातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १.६२ कोटींच्या वर पोबोचली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे १ लाख ८९ हजार ९२० जणांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus : भारताच्या मदतीसाठी तयार; फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी पुढे केला मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 14:16 IST
Coronavirus : भारतात दररोज होत होत आहे मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद. अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत असल्याचंही चित्र
Coronavirus : भारताच्या मदतीसाठी तयार; फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी पुढे केला मदतीचा हात
ठळक मुद्देभारतात दररोज होत होत आहे मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद.अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत असल्याचंही चित्र