शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रोज ११.५ लाख मास्क तयार करुनही पडताहेत कमी..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 07:40 IST

फ्रान्समध्ये आतापर्यंत दर आठवड्याला थोडेथोडके नव्हे, तर तब्बल ४० लाख मास्क तयार केले जात होते, तरीही ते कमी पडत असल्याने फ्रान्सने आता मास्कची हीच संख्या आठवड्याला ८० लाख इतकी वाढवली आहे. तिथे रोज साधारणपणे ११.५ लाख मास्क तयार केले जातात.

फ्रान्सफ्रान्समध्ये कोरोना व्हायरसचा उद्रेक अचानक सुरू झाला. तो अजूनही थांबलेला नाही. सुरुवातीच्या काळात असलेला वेग थोडासा मंदावला असला, तरी त्यात अजूनही फारसा फरक पडलेला नाही. रुग्णांची संख्या वाढतेच आहे आणि मरणाऱ्यांच्या संख्येतही दररोज भर पडते आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत फ्रान्समध्ये कोरोनाबाधितांची संख्या एक लाख २१ हजार होती. ४२,०८८ रुग्ण बरे झाले, तर आजतागायत तब्बल २१,८५६ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले.तिथे डॉक्टर्सची कमतरता आहे. आरोग्य सेवकांचा तुटवडा आहे. उपकरणांचीही फार टंचाई आहे. साधे मास्कही मिळणं अवघड झालं आहे. त्यामुळे फ्रान्स सरकारनं युद्धपातळीवर मास्क निर्मितीचा निर्णय घेतला असून, या आठवड्यापासून मास्कनिर्मिती तब्बल चार पटींनी वाढवली आहे. मास्कचा हा आकडाही हादरवणारा आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत दर आठवड्याला थोडेथोडके नव्हे, तर तब्बल ४० लाख मास्क तयार केले जात होते, तरीही ते कमी पडत असल्याने फ्रान्सने आता मास्कची हीच संख्या आठवड्याला ८० लाख इतकी वाढवली आहे. तिथे रोज साधारणपणे ११.५ लाख मास्क तयार केले जातात.यासंदर्भात फ्रान्सचेच पंतप्रधान एडुआर्ड फिलीप यांनी नुकतेच निवेदन जारी केले आहे की, ‘आमच्याकडे अजूनही मास्कची संख्या अतिशय कमी आहे. प्रत्येक नागरिकाला आम्ही मास्क पुरवू शकत नाही. तरी नागरिकांनी संयम राखावा..!’ त्यामुळे विशेषत: आरोग्य कर्मचाऱ्यांना तरी कोरोनापासून काही काळ दूर ठेवता येईल, असा फ्रान्सचा कयास आहे.ज्या ज्या पातळीवर जे जे प्रयत्न करता येतील; त्यासाठी फ्रान्स सरकार आणि तिथले संशोधक झगडत आहेत. फ्रान्सच्या संशोधकांनी कोरोना रुग्णांच्या असंख्य तपासण्याही केल्या आहेत. कोरोना विषाणू कसा आणि का पसरतो आहे, यापेक्षाही कोणामध्ये त्याचा प्रसार कमी होतो, कमी झाला आहे, याबाबतचे एक आश्चर्यजनक निरीक्षण त्यांच्या हाती आले आहे. तेथील संशोधकांच्या मते, धुम्रपान करणाºयांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या अतिशय कमी आहे. तंबाखूमध्ये ‘निकोटिन’ हा जो घटक आहे, त्यामुळे कोरोनाला अटकाव होत असावा, असा त्यांचा कयास आहे.अर्थातच कोरोनाला रोखण्यासाठी ‘धुम्रपान करा’ असा सल्ला आम्ही देणार नाही; कारण, धुम्रपान करणं अधिक घातक आहे आणि तुमच्या आरोग्याला त्यापासून अधिक हानी पोहोचू शकते,’ असा इशाराही या संशोधकांनी दिला आहे. पॅरीस हॉस्पिटलमध्ये यासंदर्भात अभ्यास केला. या अभ्यासगटाचे प्रमुख व न्युरोबायॉलॉजिस्ट जीन पेरी चॅँगुक्स यांनी आपलं निरीक्षण मांडताना म्हटलं आहे की, निकोटीनमुळे शरीरातील इतर पेशींत कोरोनाचा झपाट्यानं प्रसार रोखला जात असावा, असं आम्हाला वाटतंय, पण त्यासंदर्भात अजून संशोधन सुरू आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या